Nawazuddin Siddiqui: "तर मीही... शाहरुख, सलमान, आमिरला नवाजचा सणसणीत टोला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui: "तर मीही... शाहरुख, सलमान, आमिरला नवाजचा सणसणीत टोला...

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या मेहनतीने आणि क्षमतेने अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवाज सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'हड्डी' मूळं चर्चेत आहे.

या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरची भूमीका करत आहे. गेल्या काही वर्षांत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने लोकांना चकित केले आहे. गंभीर आशय असलेले चित्रपट असो किंवा बॉलीवूडचा टिपिकल मसाला चित्रपट असो त्याने आपल्या अभिनयाने चांगलीच छाप पाडली आहे.

हेही वाचा: Nawazuddin Siddiqui: चित्रपट फ्लॉप झाला तरी फरक पडत नाही',शाहरुखचं उदाहरणं देत नवाज म्हणाला...

एका मुलाखतीत अभिनयासाठी केलेला संघर्ष, मेहनत आणि आयुष्याबाबत मनमोकळेपणाने सांगितले, नवाजुद्दीनने अभिनय क्षेत्रात हे स्थान मिळवणं साधं नव्हत. त्याने खूप संघर्ष करत ही ओळख मिळवली आहे आणि सुरुवातीला त्याने अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत. आज तो एका वर्षात 4-5 चित्रपट करतोय. त्याचा असा विश्वास आहे की जीवनात पैसा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

हिंदी चित्रपट उद्योग हा खूप व्यावसायिक उद्योग आहे. अभिनेते शिफ्टमध्ये काम करतात आणि एकामागून एक चित्रपट करत राहतात. निर्माते आणि दिग्दर्शकांसाठीही ते योग्य असतं. त्यामूळं ते अभिनेत्यांच्या तारखांसाठी कामात तडजोड करण्यास तयार आहेत. जेव्हा नवाजुद्दीनला विचारण्यात आले की, सिनेमे कमर्शियल झाल्यामूळं कलाकारंच्या अभिनयावर याचा परिणाम झाला आहे का?

तर तो म्हणाला, 'अभिनेता हा पैशासाठी काम करतो. जेव्हा त्याला एका चित्रपटासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत तेव्हा तो 4-5 चित्रपट करतो. पुढं नवाजुद्दीन म्हणाला, 'मी एका वर्षात एक चित्रपट करण्यास तयार आहे पण एक अट आहे, जर मला चांगले पैसे मिळाले तर मी वर्षातून एक चित्रपट करेन. शेवटी सगळे पैशांवर अवलंबून आहे.

हेही वाचा: Nawazuddin Siddiqui: बाबो...नावाजला बाईच्या वेशात पाहून नजर हटेना... कसलाच देखणा..

नवाजने 'किक' आणि 'हिरोपंती 2' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं तर तो लवकरच हड्डी या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे नुरानी चेहरे, टिकू वेड्स शेरू आणि जोगिरा सारा रा रा सारख्या चित्रपटात झळकणार आहे.