Shahrukh Khan: अन् त्यानंतर शाहरुखचा प्रियंकासोबत सिनेमाच आला नाही...

Shahrukh Khan: अन् त्यानंतर शाहरुखचा प्रियंकासोबत सिनेमाच आला नाही...
Updated on

शाहरुख खान बॉलिवूडचा बादशहा आहे. त्याचा चाहतावर्ग हा प्रंचड आहे. त्याला रोमान्सचा किंग म्हटलं जात. त्याचे सर्वच रोमॅंटिक चित्रपटांना त्याच्या चाहत्यानी पार डोक्यावर घेतले आहे. वयाच्या 57 व्या वर्षीही त्यांच्या रोमान्सची तरुणींना भूरळ पडते. त्याच्या खऱ्या आयूष्यातही तो तितकाच रोमॅंटिक आहे. त्याचे अनेक अभिनेत्रीसोबतचे किस्से खूप गाजले. त्याचा सर्वात गाजलेला किस्सा प्रियांका चोप्रासोबतचा.

एकेकाळी गाजलेल्या या किस्यांमूळे गौरी खान देखील प्रियंका आणि शाहरुखच्या नात्याबद्दल शाशंक झाली होती. प्रियंका चोप्रा आणि शाहरुखच्या मैत्रीचे किस्से फिल्मी कॉरिडॉरमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. दोघांचे एकत्र फारसे चित्रपट केले नसले तरी त्यांची मैत्री काही वेळातच घट्ट झाली. 2006 मध्ये 'डॉन' चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आणि इथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. दोघांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Shahrukh Khan: अन् त्यानंतर शाहरुखचा प्रियंकासोबत सिनेमाच आला नाही...
Shah Rukh Khan Birthday: वाहतूक पोलिसांनी शाहरुखनला दिलं वाढदिवसाआधीच गिफ्ट?

या चित्रपटातूनच प्रियंकाची 'जंगली बिल्ली' यानावाने चांगलीच प्रसिद्ध झाली होती. चित्रपट संपल्यानंतरही दोघांची मैत्री कायम राहिली आणि दोघेही अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. दोघांची बॉन्डिंग सगळ्याच्या लक्षात राहिली. त्यांनतर 2011 मध्ये 'डॉन 2'मध्ये दोघेही पुन्हा एकत्र आले होते. पुन्हा एकदा दोघांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि शूटिंगदरम्यान शाहरुख आणि प्रियंकाने खूपच धमाल केली. दोघांच्या वाढत्या जवळिकमुळे त्यांच्या मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याची चर्चा होती. त्यातच प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. शाहरुखने जरी या नात्याला फक्त मैत्रीचं नाव देत असला तरी त्यांच्या वाढत्या बाँडिंगमूळे त्याच्यात मैत्रींपेक्षा जास्त असल्याचं बोललं जायचं.

Shahrukh Khan: अन् त्यानंतर शाहरुखचा प्रियंकासोबत सिनेमाच आला नाही...
Shah Rukh Khan Birthday: शाहरुखची झलक सगळ्यात अलग ; शाहरुखचे चित्रपटातील बेस्ट कॅमिओ रोल

त्याच्या या वाढत्या चर्चामुळे शाहरुखची पत्नी गौरी खानला कधीच असुरक्षित वाटले नाही. मात्र 2012 मध्ये करण जोहरच्या वाढदिवसाला शाहरुखने स्वतः जबरदस्ती प्रियंकाला आमंत्रित केलं. प्रियांकाच्या आगमनावर शाहरुखचा प्रतिसाद पाहून गौरीच्या मनात शंकेची पाल चुकचूकली.

प्रियंका चोप्रा तिच्या आणि शाहरुख खानच्या अफेअरबद्दल कधीच उघडपणे बोलली नाही. एका शोच्या मुलाखतीत प्रियंका तपकिरी रंगाचे जॅकेट घातले होते. शोच्या फॉरमॅटनुसार सेलिब्रिटींना त्यांची एक वस्तू शोमध्ये सोडावी लागत होती. तेव्हान प्रियंका चोप्राने तिचे तपकिरी रंगाचे जॅकेट शोमध्ये सोडले. यावेळी तिने सांगितले की हे जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे आहे, जे ती एअरपोर्टवर वापरते. यानंतर सोशल मीडियावर असे अनेक फोटो समोर आले ज्यात शाहरुख खाननेही हे जॅकेट घातले होते.

Shahrukh Khan: अन् त्यानंतर शाहरुखचा प्रियंकासोबत सिनेमाच आला नाही...
Shahrukh Khan: बायकोइतकीच शाहरुखच्या आयुष्यात महत्वाची आहे 'ती', कोण आहे पूजा ददलानी?

यामूळे प्रियंकसोबतच्या अफेअरच्या चर्चा यामुळे गौरीने शाहरुखला प्रियंकासोबत कोणताही चित्रपट साईन न करण्याची सक्त ताकिदच दिली. गौरींच्या सांगण्यानुसार शाहरुखने यानंतर प्रियंकासोबत एकही चित्रपट केला नाही. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणंही टाळलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com