
Brahmastra: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा ९ सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. सिनेमाला दमदार ओपनिंग मिळाले आहे. ब्रह्मास्त्रची पहिल्या दिवशीच भारतातली कमाई ३६ करोडहून अधिक झाली आहे. हिंदी व्हर्जनविषयी सिनेमाच्या बोलायचं झालं तर ३२ करोडहून अधिक कमाई झाली आहे. तर जगभरातील कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर ब्रह्मास्त्रचं ग्रॉस कलेक्शन ७५ करोड इतकं आहे. तर नेट कलेक्शन ६५ करोडच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.(brahmastra opening boxoffice collection in telugu will help bollywood pan india release)
ओपनिंगलाच कलेक्शनचा मोठा आकडा पाहून लोक मात्र हैराण झाले आहेत,तसंच बॉक्स ऑफिसचे विद्यमान पंडीतही आपल्या अंदाजापेक्षा सिनेमानं अधिक कमाई केल्यामुळे थक्क झाले आहेत. रणबीर आणि आलियाच्या करिअरमधला ब्रह्मास्त्र सर्वात मोठी ओपनिंग देणारा सिनेमा बनला आहे. तर २०२२ मधला बॉलीवूडमधील ओपनिंगला सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून ब्रह्मास्त्रची नोंद झाली आहे. तसंच,ब्रह्मास्त्र कोणत्याही हॉलिडे सिझनमध्ये रिलीज न होता देखील अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये टॉपला गणला जात आहे.
आता एवढ्या सगळ्या रेकॉर्डमध्येच ब्रह्मास्त्रने बॉयकॉट-ट्रोलिंगच्या संकटांशी दोन हात करत मोठी झेप घेतलीय हे बॉलीवूडसाठीचांगले संकेत मानले जात आहेत. साऊथ इंडस्ट्रीत बनलेले साऊथचे सिनेमे गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व्हर्जनमध्ये देखील गलेलठ्ठ कमाई करत आहेत. मग तो बाहुबली असो की केजीएफ,आरआरआर की अलिकडेच प्रदर्शित झालेला कार्तिकेय २. पण याचवेळेला जेवढे हिंदी सिनेमे साऊथ मध्ये रिलीज केले गेले त्यांनी तिकडे काही कमाल करुन दाखवली नाही. पण ब्रह्मास्त्र आता याबाबतीतही चांगल्या पद्धतीनं पुढं चालल्याचं बोललं जात आहे.
बॉक्सऑफिस कलेक्शनमध्ये,तेलुगु सर्किट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंध्रप्रदेश/ तेलंगणात ब्रह्मास्त्रच्या अॅडव्हान्स बुकिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. इथे ब्रह्मास्त्रने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास २ करोडहून अधिकचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. रिपोर्ट्स तर सांगत आहेत की आतापर्यंत ओपनिंगचं ग्रॉस कलेक्शन ६ करोडहून अधिक झालं आहे.
आता हे ६ करोड कलेक्शन फक्त तेलुगु व्हर्जनमध्ये झाले आहे. तेलुगु व्हर्जनसाठी मिळलेल्या या दमदार ओपनिंग कलेक्शनमुळे ब्रह्मास्त्रने २०१३ मध्ये आलेल्या धूम ३ चा रेकॉर्ड तोडल्याचं बोललं जात आहे. आमिर खान,अभिषेक बच्चन,कतरिना कैफअभिनित धूम २ ने आंध्रप्रदेश,तेलंगणात जवळपास ५ करोडचे कलेक्शन केले होते.
हिंदीसोबतच ५ अन्य भाषांमध्ये रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्रने आपल्या ३६ करोडच्या नेट कलेक्शनमधून ३२ करोड हे हिंदी व्हर्जनमधून कमावले आहेत. पण यानंतर दुसऱ्या नंबरवर सिनेमाचा तेलुगू व्हर्जन आहे. ब्रह्मास्त्रच्या तेलुगू व्हर्जनने पहिल्या दिवशी जवळपास ३.५ करोडचे कलेक्शन केले आहे.
रणबीर-आलियासोबत सिनेमात नागार्जुनही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नागार्जुन तेलुगूतील मोठे स्टार आहेत. तसंच, बाहुबली आणि आरआरआर सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांनी देखील सिनेमाला पाठिंबा दिला आहे. आलियाने देखील २०२२ मध्ये आरआरआर सिनेमाच्या माध्यमातून तेलुगू सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तिच्या भूमिकेला लोकांनी पसतं केलं होतं. ब्रह्मास्त्रच्या हैदराबादमधील एका इव्हेंटला ज्युनिअर एनटीआर उपस्थित होता. तर चिरंजीवीनं ब्रह्मास्त्रच्या तेलुगू ट्रेलरसाठी डबिंग केलं होतं. आणि सिनेमाला प्रमोटही केलं होतं. बॉलीवूड आणि तेलुगु स्टार्सचा हा याराना ब्रह्मास्त्रसाठी मात्र फायद्याचा ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.