
Sulochana Didi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुलोचना दीदींच्या अंत्यदर्शनाला! राहत्या घरी जाऊन केले कुटुंबियांचे सांत्वन
Solochana Latkar Passed Away: मायेची पाखर घालणारी 'आई' ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. सर्वांच्या लाडक्या आणि गुरु स्थानी असणाऱ्या 'सुलोचना दीदी' यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.
त्या 94 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळ आणि श्वसनाचे आजार यामुळे त्यांचे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवार 5 जून रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सध्या त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथीलंन राहत्या घरी आज अत्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्य दर्शन घेतले.
(CM eknath shinde visit Sulochana latkar house for pay last respect )
सुलोचना दीदी यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर ते दिल्ली दौऱ्याहून परतत थेट प्रभादेवी येथील सुलोचना दीदींच्या घरी गेले. यावेळी त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मानसिक धीर दिला.
या भावनिक प्रसंगाचे फोटो शेयर करत, एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट शेयर केले आहे.
या ट्विट मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की.. 'सिनेसृष्टीची 'आई' अशी ओळख असलेल्या दिवंगत अभिनेत्री #सुलोचनादीदी लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.'
'आज यांच्या दादर प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दीदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.'
'सुलोचना दीदींचे निधन ही महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला चटका लावणारी घटना आहे. सुलोचना दीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी आपल्या आईपासून पोरकी झाली आहे,' असे मनोगत यावेळी व्यक्त केले.