झारखंडमधल्या गरीब मुलींच्या मदतीसाठी धावला 'कॉमेडियन'

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात मदतीचा हात पुढे केला होता.
Amit Tondon
Amit Tondon

Entertainment News: बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात मदतीचा हात पुढे केला होता. त्यासगळ्यात अभिनेता सोनु सूदनं (Sonu Sood) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कोरोनाकाळात मदत कार्यात सर्वाधिक वेळ सक्रिय असणारा सेलिब्रेटी म्हणून सोनुला (Bollywood News) नेटकऱ्यांटची दादही मिळाली होती. सध्या टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी कॉमेडियन अमित टंडन (Amit tondon) हा त्याच्या मदत कार्यामुळे चर्चेत आला आहे. त्यानं झारखंडमधील जीवनावश्यक सुविधांपासून वंचित असणाऱ्या मुलींना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

अमित हा त्याच्या हटकेपणासाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहणारा चेहरा आहे. सध्या त्यानं एक मदतकार्य हाती घेतलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे मुंबईतील जे कार्यक्रम येत्या काळात पार पडणार होते. त्यांची वेळ आणि तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचे एक कारण म्हणजे अमितनं झारखंडमधील समाजकार्यासाठी दिलेला वेळ हे आहे. झारखंडमध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. अशावेळी त्यांना सहकार्य करण्यासाठी अमितनं पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तो काही रक्कम एका संस्थेच्या माध्यमातून त्या मुलींपर्यत पोहचवणार आहे.

Amit Tondon
आली लहर, केला कहर! कचोरी खायची म्हणून मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO VIRAL

आपण केवळ कलाकार नसून समाजाप्रती आपली एक महत्वाची जबाबदारी देखील आहे. अशावेळी समाजात ज्या गोष्टी चूकीच्या पद्धतीनं होत आहे त्याविरोधात आवाज उठवणं हे आपलं काम आहे. आणि आपल्याला शक्य होईल ती मदत करणेही महत्वाचे आहे. जेणेकरुन सामाजिक भूमिका व्यक्त केल्याचे समाधान आपल्याला मिळते. मी एका एनजीओच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचे ठरवले आहे. आपल्या कामामुळे कुणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार असेल तर त्यासारखी मोठी गोष्ट नाही. असेही अमितनं यावेळी सांगितले.

Amit Tondon
Viral: शबाना आझमींच्या भाचीसोबत कॅब चालकानं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com