Country Of Blind Oscar Nominated: हिना खानची आता परदेशातही हवा! 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ची ऑस्करमध्ये एंट्री!

हिना खानचा चित्रपट द कंट्री ऑफ ब्लाइंड ऑस्कर 2024 साठी नामांकित झाला आहे.
Country Of Blind Oscar Nominated:
Country Of Blind Oscar Nominated:Esakal

Country Of Blind Oscar Nominated: टिव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही नेहमी चर्चेत असते. कधी व्यावसायिक कारणामुळे तर कधी वैयक्तिक कारणामुळे. ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेतून हिनाला खरी प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती बिग बॉसमध्येही दिसली. बिग बॉसमुळे तिला लोकप्रियता मिळाली.

टीव्हीपासून सुरुवात करत हिनाने बॉलिवूड अन् आता हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. आता हिना तिच्या अभिनयाची जादू परदेशात दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

हिना खानचा चित्रपट द कंट्री ऑफ ब्लाइंडला ऑस्कर 2024 साठी नामांकन मिळाले आहे. द कंट्री ऑफ ब्लाइंड हा चित्रपट एचजी वेल्सच्या कादंबरीवर आधारित आहे.

या चित्रपटाला IMDb ने या 8.5 रेटिंग दिले होते. द कंट्री ऑफ ब्लाइंड चित्रपटाला ऑस्कर लायब्ररीतही स्थान मिळाले आहे. हिना खानच्या या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Country Of Blind Oscar Nominated:
Namrata Sambherao: "हा निर्णय मी...!" 'कुर्ररर' नाटक सोडल्याचं खरं कारण नम्रताने सांगितलं

हिना खान ही पोस्ट शेयर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. हिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, पुरस्कारांच्या जगात, सर्वात प्रतिष्ठित ऑस्करच्या शर्यतीत धावणं खूप खास आहे, आम्ही थोडे दूर असलो तरी खूप जवळ आहोत, जिंकण्याची आशा आहे कारण आम्ही नामांकनापर्यंत पोहोचलो आहोत. थोडेसे आमच्या स्वप्नाच्या जवळ. आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद मिळत देत रहा, जेणेकरून आमचे स्वप्न पूर्ण होईल.

अंध व्यक्तींच्या जीवनावर आणि त्यांच्या अडचणींवर आधारित या चित्रपटाला परदेशातही खूप पसंती मिळाली. कंट्री ऑफ द ब्लाइंडला ऑस्कर लायब्ररीत मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये स्थान मिळाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रहबत शाह काझमी यांनी केले आहे.

Country Of Blind Oscar Nominated:
Bishan Singh Bedi Bipoic: भारताचे दिग्गज माजी खेळाडू बिशन सिंग बेदी यांच्यावर येणार बायोपिक! लेकानं केली घोषणा!

हिना खान सोबत या चित्रपटात शोएब निक, मीर सरवर, अनुष्का सेन, इनामुलहक, अहमर हैदर, प्रद्युमन, नमिता लाल, हुसैन खान, जितेंद्र राय, राहत शाह काझमी, ज्युलियन सीझर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com