
HBD Sachin:तेव्हा दिलेल्या वचनामुळे सचिन आजही गुटखा दारूची जाहिरात करत नाही
क्रिकेटच्या जगतातल काहीही आठवयचं झालं तर चटकन नाव आठवतं ते सचिन तेंडुलकरचं. सचिनने क्रिकेट क्षेत्रात त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.आपण सगळे टिव्हीवर जाहिराती बघतोच. आणि अनेक जाहिरातीत तुम्ही साचिनलाही बघत असालच.पण सचिनने मात्र त्याच्या आयुष्यात आतापर्यंत कधीही तंबाखूजन्य किंवा अल्कोहोलिक पदार्थांची जाहिरात केलेली नाही.त्याने त्याच्या अगदी जवळच्या माणसाला फार पूर्वी एक वचन दिले होते.ज्यामुळे अतोनात पैसा मिळत असतानाही सचिनने अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीच्या दुसऱ्या वस्तूंची सुद्धा कधी जाहिरात हाती घेतली नाही.आज साचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने घेतलेल्या या वचनाबद्दल जाणून घेऊया.
सद्या सगळीकडे अक्षय कुमार , अजय आणि शाहरूखच्या विमल जहिरतीवरून टोकाचे मतभेद आणि चर्चा सुरू आहे.(Sachin Tendulkar)ज्याची त्याची निवड आणि इच्छा म्हणत जेथे अजयने या वादाला प्रतिउत्तर दिले तेथे या सगळ्यांचा खोलवर परिणाम झालेल्या अक्षय कुमारने जनतेची माफी मागितली.बक्कळ पैसे घेऊन काही अभिनेत्यांनीच नाही तर क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी अल्कोहोलशी संबंध असणाऱ्या अनेक कंपनींसाठी जाहिराती केल्यात.मात्र सचिनने सुरुवातीपासूनच भरपूर पैसा मिळूनही तंबाखूजन्य किंवा अल्कोहोलिक कुठलीही गोष्ट बनवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीसाठी होकार दिला नाही.
हेही वाचा: Sachin Tendulkar Birthday Special: क्रिकेटच्या बादशहाची; लग्नापर्यंतची रंजक लव्हस्टोरी
सचिनला त्याच्या वडिलांबद्दल खूप आदर आहे. एकदा त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे बसून एक गोष्ट समजवली होती.ते म्हणाले,"तू आज अनेकांसाठी आदर्श बनला आहे.त्यामुळे तुझ्या कुठल्याही गोष्टींचा लोकांवर वाईट परिणाम होऊ नये याचे भान ठेव."त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांना वचन दिले होते,की तो वाईट गोष्टींना कधीच प्रोत्साहन देणार नाही.आणि सचिनने आजपर्यंत ते वचन कधी मोडले नाही.मात्र काही ऑनलाईन अमली पदार्थांच्या जाहिरातीत त्याचे फोटोज नकळतपणे लावले गेलेत.सचिनने सोशल मीडियावर तशी पोस्टही टाकली आहे.'मी कधीही अशा पदार्थांना प्रोत्साहन दिले नाही आणि देणारही नाही.(IPL)त्यामुळे मला अशा कुठल्याही जाहिरातीत अप्रत्यक्षपणे खेचू नये'.असे ट्वीट त्याने केले आहे.
२०१० मधे सचिनला यूबी ग्रुपने २० करोडची रक्कम जाहिरातीसाठी ऑफर केली होती.परंतु सचिनने त्यास साफ नकार दिला होता.त्याने वडिलांना तेव्हा दिलेले वचन आजही सचिन प्रामाणिकपणे पाळतोय.आयपीएलच्या वेळीसुद्धा सचिनने 'ओ ला ला ले ओ'या जाहिरातीसाठी नकार दिला होता.कारण जाहिरात ऑफर करणारी कंपनी अंमली पदार्थांचे उत्पादन करणारी होती.त्याचे मते अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीच्या दुसऱ्या चांगल्या गोष्टींची जाहिरात करणे देखील चूकीचेच आहे.
Web Title: Cricketer Sachin Tendulkar Birthday Special Storyhe Never Promotes Tobacco And Alcoholic
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..