Cuttputli Twitter Review : अक्षयच्या चित्रपटाला कोणी म्हणाले विलक्षण; तर कोणी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cuttputli Twitter Review News

Cuttputli Twitter Review : अक्षयच्या चित्रपटाला कोणी म्हणाले विलक्षण; तर कोणी...

Cuttputli Twitter Review News अक्षय कुमारचा (Akshay Kumar) कठपुतली हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली होती. चित्रपट पाहिल्यानंतर युजर्स ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाला आतापर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काहीजण या चित्रपटाचे कौतुक करीत आहेत तर काहींना तो विशेष वाटला नाही.

चित्रपटाची कथा एका छोट्या शहरातील पोलिसाची आहे. जो कसौलीतील सीरियल किलरचा शोध घेत आहे. हा सीरियल किलर मुलींना मारतो. या चित्रपटात अक्षय अर्जन सेठी नावाच्या पोलिसाची भूमिका साकारत आहे. अर्जुनने कसौलीला या सीरियल किलरपासून वाचवणार असल्याची शपथ घेतली आहे. मात्र, हे प्रकरण त्याच्यासाठी कठीण होत आहे.

हेही वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी व निर्माता रविंदर चंद्रसेकर विवाहबद्ध

‘हा चित्रपट निसर्गाच्या सौंदर्यात कसौली येथे घडलेल्या कुरूप हत्याकांडाचा खुलासा करतो. यात तुम्हाला खूप ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतील. मी अर्जन सेठी या तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ज्याला सायको किलरला पकडायचे आहे. चित्रपट पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळेच हा चित्रपट वेगळा ठरतो’, असे चित्रपटाविषयी बोलताना अक्षयने (Akshay Kumar) सांगितले होते.

वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि पूजा एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत एम तिवारी यांनी केले आहे. अक्षय व्यतिरिक्त चित्रपटात सरगुन मेहता आणि चंद्रचूर सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Cuttputlli Movie Twitter Review Akshay Kumar Actor Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..