आमिरकडे काम मागायला लाज वाटेल; ‘तारे जमीन पर’ फेम दर्शील सफारीचे भाष्य

माझ्यावर दबाव येऊ नये असे मला वाटते
Darsheel Safary, Aamir Khan News
Darsheel Safary, Aamir Khan NewsDarsheel Safary, Aamir Khan News

Darsheel Safary, Aamir Khan News आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातून आमिर खानने (Aamir Khan) करोडो लोकांची मने जिंकली. तसेच अभिनेता दर्शील सफारीनेही (Darsheel Safary) लोकांच्या मनावर छाप सोडली. हा बाल अभिनेता आता १० वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी तो ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये दिसत होता. परंतु, आता तो मोठ्या पडद्यावर प्रथमच प्रौढ म्हणून दिसणार आहे.

दर्शीलने आपल्या करिअरची (Career) सुरुवात आमिर खानसोबत (Aamir Khan) केली होती. तो कधीही त्याची मदत मागू शकला असता. परंतु, शॉर्टकट घेणे स्वभावात नाही, असे दर्शील सफारी म्हणाला. मला वाटतं की हे सगळं करणं काही तरी शॉर्टकट घेण्यासारखं आहे. त्यांच्याकडून काम मागायला मला खूप लाज वाटेल. मला नेहमी वाटते की तुम्ही जे करीत आहात ते तुम्ही कमवावे. असे नाही की मला कोणताही लांब कट घ्यावा लागेल. माझ्यावर दबाव येऊ नये असे मला वाटते, असेही दर्शील सफारी म्हणाला.

Darsheel Safary, Aamir Khan News
Raju Shrivastava : राजूचे कुटुंब पोहोचले गुरुद्वारात; सुनील पाल म्हणाला...

बाल कलाकार म्हणून दर्शील सफारीचा (Darsheel Safary) पहिला चित्रपट मानसिक आरोग्यावर होता. आता त्याचा आगामी चित्रपट देखील मानसिक आरोग्यावर आहे. याआधी दर्शील सफारी हा सेलिब्रिटी डान्स शो मिडनाइट्स चिल्ड्रनमध्येही दिसला होता. २०१२ मध्ये आलेल्या या शोला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com