लठ्ठपणाने तिला दिला आत्मविश्वास, अक्षय कुमारबरोबर 'या' चित्रपटात झळकणार!

असे कित्येक प्रसंग असतील ज्यावेळी मला वजनामुळे अपमान सहन करावा लागला आहे.
Deepika Khanna And Akshay Kumar
Deepika Khanna And Akshay Kumaresakal

अक्षय कुमारची भूमिका असलेल्या रक्षाबंधन चित्रपटात दीपिका खन्नाला (Deepika Khanna) चार बहिणी असतात. दीपिका अक्षयची सर्वात जास्त वजन असलेली बहीण असते. आपल्या वजनामुळे नेहमी ऑडिशनमध्ये नाकारल्या गेलेल्या दीपिकाला तिच्या वजनामुळे मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये अक्षय कुमारबरोबर (Akshay Khanna) काम करण्याची संधी मिळाली. दीपिकाने सांगितले, की चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच ८ महिन्यांपूर्वी माझ्याजवळ त्याची पटकथा आली होती. अगोदर मी त्यांना एक टेक पाठवला. मग दोन-तीन महिन्यानंतर मला पुन्हा टेस्टसाठी बोलवले गेले. (Deepika Khanna Play Role As Sister Of Akshay Khanna In Rakshabandhan)

Deepika Khanna And Akshay Kumar
PHOTOS | दीपिका अन् रणवीरच्या खास क्षणाचे छायाचित्रे, दोघांनीही केले शेअर

तीन-चार वेळा ऑडिशन दिल्यानंतर शेवटी मला एक दिवस प्रोडक्शन हाऊसमध्ये बोलवले गेले. तेथे माझ्या व्यतिरिक्त एक आणखी मुलगी त्याच भूमिकेसाठी पोहोचली होती. जेव्हा मी तेथून निघाले, तर एक तासानंतर फोन आला की तुमची निवड झाली. आम्हाला अगोदरच सांगितले गेले होते, की या चित्रपटात अक्षय कुमार असतील.

लठ्ठ आहे...

दीपिका म्हणते मी अगोदरच आपल्या वजनाचे वास्तव स्वीकारले होते. मी वजनाच्या बाबत चिंता केलेली नाही. मी जशी आहे तशी स्वतःचा स्वीकार केला आहे. असे कित्येक प्रसंग असतील ज्यावेळी मला वजनामुळे अपमान सहन करावा लागला आहे. मात्र ज्या ठिकाणी काम केले आहे, तेथे माझे वजनच माझा यूएसपी बनला. मी तर वजना ताकद असल्यासारखे घेतले आहे. वजन कमी कर, असे मला दररोज बहुतेकांकडून दिले जातात. मला त्याचा कमीपणा वाटला नाही. उलट माझ्या वजनाने माझा आत्मविश्वास वाढला आहे.

.

Deepika Khanna And Akshay Kumar
हिरो कसे बनाल?, असे म्हणत ऋषीकेश मुखर्जी बच्चन अन् धर्मेंद्रावर रागावले

जाॅन अब्राहम अन् दीपिका

दीपिकाने प्रिंट शूटपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तेथे तिला कल्पना नव्हती की कुठून आपल्याला सुरुवात करायची आहे. ती ऑनलाईन जाऊन नंबर शोधायची, ऑफिस शोधायची आणि मग ऑडिशन द्यायला जायची. तिला पहिला ब्रेक प्रिंट शूटचा मिळाला. ती सेटवर पोहोचली, तर तिला कळाले की नॅशनल जिओग्राफी चॅनलसाठी आहे आणि तेही जाॅन अब्राहम (John Abraham) बरोबर. दीपिकाने सांगितले, की मला स्टुलवर जाॅनच्या पुढे उभे व्हायचे आहे. तेथे माझे काम फक्त स्मितहास्य करण्याचे होते आणि जाॅन माझा किस घेईल. त्यावेळी मी २१ वर्षांची असेल, मला त्याचा फारच आनंद झाला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com