कॅलेंडरवरनं कशी पोहोचली मोठ्या पडद्यावर?,शाहरुखनं नाही तर 'या' गायकानं दिलेला पहिला ब्रेकDeepika Padukone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone birthday...First break to calendar girl deepika padukone..read inside story

Deepika Padukone: कॅलेंडरवरनं कशी पोहोचली मोठ्या पडद्यावर?,शाहरुखनं नाही तर 'या' गायकानं दिलेला पहिला ब्रेक

Deepika Padukone: आज बॉलीवूडची शांती म्हणजेच दीपिका पदुकोण 5 जानेवारीला तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका सध्या तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे ज्यामध्ये ती शाहरुख खानसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे.

पण हे कमी लोकांना माहिती असेल की दीपिका पदुकोण आधी एका कॅलेडरसाठी मॉडेल म्हणून प्रकाशझोतात आली होती आणि त्यानंतर हिमेश रेशमियाने तिला पहिला-वहिला ब्रेक दिला होता.(Deepika Padukone birthday...First break to calender girl deepika padukone..read inside story)

हेही वाचा: Deepika Padukone Birthday: लग्नानंतरही बिनधास्तपणे बोल्ड आणि इंटीमेट सीन देते दीपिका पदूकोण, कारण..

दीपिका पदुकोण ने राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू असूनही मॉडेलिंगचा मार्ग निवडला आणि अनेक वर्षे मॉडेलिंग केले. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर तिला पहिली साबणाच्या जाहिरातीची ऑफर आली आणि त्यानंतर 2005 मध्ये ती प्रसिद्ध बीझनेसमन विजय माल्याच्या किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये दिसली. त्यानंतर हिमेश रेशमियाने त्याच्या 'नाम है तेरा' म्युझिक व्हिडिओमध्ये दीपिकाला कास्ट केल्यानं तिला एक मोठा ब्रेक मिळाला.

हेही वाचा: Deepika Padukone Net Worth : दीपिका पती रणवीर पेक्षाही श्रीमंत; करोडोंची आहे मालकीण

जेव्हा दीपिका तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'इंडियन आयडॉल 11' मध्ये पोहोचली तेव्हा तिने हिमेशचे पहिला ब्रेक दिल्याबद्दल आभार मानले. दीपिका म्हणाली, 'फराह खान आणि शाहरुख खान यांनी 'नाम है तेरा तेरा'चा म्युझिक व्हिडिओ पाहिल्यानंतरच मला त्यांच्या चित्रपटात कास्ट केले होते.

दीपिका पदुकोणने चित्रपटात पहिले पाऊल ठेवले ते 2006 मध्ये आलेल्या 'ऐश्वर्या' या कन्नड चित्रपटातून आणि तिथून खऱ्या अर्थानं तिनं फिल्मी दुनियेत पदार्पण केले होते.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: पब्लिकच्या फोनवर फिरतोय सातारच्या बच्चनचा भावूक मेसेज..किरण माने म्हणाले,'जमेल तसं..'

ओम शांती ओमच्या आधीही दीपिकाला अनेक चित्रपटांची ऑफर आली होती, मात्र नशीबात वेगळंच लिहिलं होतं. वास्तविक, दीपिकाला सलमान खानसोबत लॉन्च केले जाणार होते, परंतु असे होऊ शकले नाही आणि 2007 मध्ये दिग्दर्शक फराह खानने दीपिकाचे टॅलेंट ओळखले आणि तिला 'ओम शांती ओम' या चित्रपटासाठी साइन केले.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: हे आहेत Top 3! प्रेक्षकच नाही तर अख्ख्या मराठी इंडस्ट्रीनं घेतली 'या' तिघांची नावं

'रेस', 'लव्ह आज कल', 'चेन्नई एक्सप्रेस', 'कॉकटेल', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' अशा अनेक हिट चित्रपटात दीपिका पदुकोणने बाजी मारली आहे इतकेच नव्हेतर दीपिकाने 'xxx : द रिर्टन ऑफ झँडर केज' या हॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं आहे आणि ती या चित्रपटाच्या पुढच्या पार्ट मध्ये देखील दिसणार आहे.

दीपिकानं जो प्रवास सुरु केला त्यात तिने मागे वळून पाहिले नाही आणि आज ती बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.