
'कोणीही विश्वास ठेवत नसताना, माँ तुम्ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद !'
मुंबई : बाॅलीवूड कलाकार दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) शनिवारी भावूक पोस्ट केली. कोणीही विश्वास ठेवत नसताना संधी दिल्याबद्दल दिग्दर्शिका फराह खानचे (Farah Khan) दीपिकाने आभार मानले आहे. इंस्टाग्रामवर 'मै हूँ ना' च्या दिग्दर्शिकेने चेन्नई एक्स्प्रेस कलाकाराच्या लक्झरी ब्रँडचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यात तिने लुकिंग गुड बेबी, असे कॅप्शन दिले आहे. या स्टोरीला प्रतिक्रिया देताना पिकू कलाकाराने आभार मानले आणि भावनिक पोस्टमध्ये लिहिले, धन्यवाद माँ.. जेव्हा कोणीही विश्वास ठेवत नव्हते, तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला.
हेही वाचा: श्रीलंकेतील संकटावर स्वरा भास्कर स्पष्टच बोलली; म्हणाली, न मिट सकेंगे एक दिन!
दीपिकाच्या संदेशाला उत्तर देताना तीस मार खान दिग्दर्शिका लिहिते, त्यापूर्वीही तू तारा होतीच, त्यामुळे तुझा अभिमान आहे. फराहने 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून तिला बाॅलीवूडमध्ये आणले. त्याबरोबरच शाहरुख खान असलेला 'ओम शांती ओम' हा चित्रपट ब्लाॅकबस्टर हिट ठरला. यातून दीपिका एका रात्रीत स्टार झाली.
हेही वाचा: 'द घोस्ट'मधील नागार्जुनच्या भूमिकेची चर्चा, केवळ ४९ सेकंदात ८ जणांची हत्या
या यशानंतर दोघींनी २०१४ मधील 'हॅपी न्यू एअर'चित्रपटासाठी काम केले. यात शाहरुख खान, अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी आणि जॅकी श्राॅफ या दिग्गज कलाकर होते. या दुसऱ्या चित्रपटानेही चांगली घसघशीत ४०० कोटींची जगभरातून कमाई केली.
Web Title: Deepika Padukone Thanks Farah Khan For Giving Opportunity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..