
अमिताभनी 'या' कारणानं डिलीट केली कंगनासाठी लिहिलेली पोस्ट; ब्लॉगमधून खुलासा
बॉलीवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) सिनेमांसोबतच सध्या सोशल मीडिया(Social Media) प्लॅटफॉर्मवरही अधिक सक्रिय असलेले पहायला मिळतात. अमिताभ नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या सिनेमा संदर्भात अपडेट देत असतानाच वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. अनेकदा तर अमिताभ बॉलिवूडच्या सिनेमांचे ट्रेलर,गाणी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्यांची प्रशंसा देखील करताना दिसतात.
हेही वाचा: कमल हासन विरोधात तक्रार; केंद्र सरकारचा अपमान केल्याचा आरोप,काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच त्यांनी कंगना रनौतच्या(kangana Ranaut) धाकड(Dhaakad) सिनेमातील पहिलं गाणं शेअर केलं होतं. पण काही वेळानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केलेली दिसून आली त्यामुळे सगळेच हैराण झाले. नेमकं झालं काय याबाबत काहीच कुणाला कळेना. पण आता खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नकळत याचा खुलासा केला आहे. यामाध्यमातून कंगनाच्या सिनेमातील गाणं त्यांनी का डिलीट केलं हे सांगितलं आहे.
हेही वाचा: छत्रपती संभाजी महाराजांवरचा चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ लवकरच...
अमिताभ बच्चन यांनी कंगनाच्या 'धाकड' सिनेमातील गाणं शेअर करीत लिहिलं होतं,''हीनं आग लावली आहे..''.अर्थात काही वेळानंतर ही पोस्ट त्यांनी डिलीट केलेली दिसून आली. आता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर ब्लॉगच्या माध्यमातून यावर खुलासा केला आहे. अमिताभ यांनी सांगितलं आहे की त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्ससंदर्भात सरकारनं त्यांना नोटीस पाठवली आहे. आता काही लोकांचं म्हणणं पडलं की कंगनाच्या सिनेमातील गाणं डिलीट करण्यामागे सरकारनं त्यांना पाठवलेली ही नोटीस हेच कारण असावं.
हेही वाचा: संजय-मान्यता दत्तमध्ये 'का रे दुरावा'; अभिनेत्यानेच केला खुलासा
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, ''भारत सरकार आणि अॅडव्हर्टायजिंग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाचे काही कडक नियम-कायदे आणि मार्गदर्शक सूचना ठरलेल्या आहेत. सोशल मीडियासाठी त्यांनी काही नवीन नियम सांगितले आहेत. जर आपण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणत्याही उत्पादनाचं प्रमोशन केलं तर त्यासोबत आपली पार्टनरशीप आहे का हे सांगावं लागेल अन्यथा ते कायद्यानं गैर मानलं जाईल''. म्हटलं जातंय की कंगनाच्या 'धाकड' सिनेमातील गाण्यासंदर्भातील पोस्ट अमिताभ यांनी म्हणूनच काढून टाकली असावी.
हेही वाचा: 'बलात्कार एक सरप्राइज सेक्स'; सनीला हे खळबळजनक ट्वीट करणं पडलं होतं महाग
अमितभ बच्चन नुकतेच आपल्या अजय देवगणच्या 'रनवे ३४' सिनेमात दिसले होते. बॉक्सऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता अमिताभ लवकरच रणबीर कपूर,आलिया भट्ट यांच्यासोबत 'बह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना,नीना गुप्तासोबत 'गूडबाय' सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या ते व्यस्त आहेत.
Web Title: Did Amitabh Bachchan Just Reveal Why He Deleted Kangana Ranauts Dhaakads
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..