'धुरळा'चा दिग्दर्शक समीर विद्वांस राष्ट्रपतींवर भडकला, कारण...

Dhurala Director Sameer Vidwans gets angry on President Ramnath Kovind for not attending national awards
Dhurala Director Sameer Vidwans gets angry on President Ramnath Kovind for not attending national awards
Updated on

गेल्या वर्षापासुन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळता उपराष्ट्रपतींच्या हस्ते मिळत आहे. यामुळे 'धुरळा' चित्रपटाचा दिग्दर्शक समीर विद्वांस संतापला. ट्विटरद्वारे त्याने हे संताप व्यक्त केला. या मानाच्या पुरस्कारासाठी राष्ट्रपतींना तीन तास वेळ काढता येत नाही का? असा सवाल समीर विद्वांसने केला. या वर्षी हा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी प्रदान केला. 

समीर विद्वांस यांनी ट्विट केले की, "मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय?! ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत?! मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व काढतच होते की वेळ! त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना!" अशा शब्दांत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

मागच्या वर्षीपासुन हा पुरस्कार राष्ट्रपती ऐवजी इतरांकडू प्रदान केला जात आहे. 65 व्या पुरस्काराचे वितरण  माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्याकडून पुरस्कार मिळणार नाही हे कलाकारांना समजताच कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

या वर्षीचा 66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु त्यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात प्रदान करण्यात आला. नाळमधील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला (चैत्या) सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्काराने गौरविण्यात आले. आयुष्मान खुरानाला 'अंधाधुन', विक्की कौशलला: 'उरी', तर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला 'महानटी' यांना या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेखा सीकरी यांना 'बधाई हो' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com