Good Newwz Trailer : 'गूड न्यूज' असलेल्या अक्षय-करिनाने अखेर लावला डोक्याला हात; पाहा ट्रेलर

टीम ईसकाळ
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांज, कियारा आडवानी अशी भन्नाट स्टारकास्ट असलेल्या 'Good Newwz'चा ट्रेलर काल (ता. 17) लॉन्च झाला. एका दिवसातच जवळपास 4 लाख व्ह्यूजचा टप्पा या ट्रेलरने पार केला आहे. 27 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अक्षय कुमार, करीना कपूरच्या 'गुड न्यूज' पोस्टरनेच धमाल उडवून दिलेली असतानाच, काल रिलीज झालेल्या ट्रेलरने तर धुमाकुळ घातला आहे. अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांज, कियारा आडवानी अशी भन्नाट स्टारकास्ट असलेल्या 'Good Newwz'चा ट्रेलर काल (ता. 17) लॉन्च झाला. एका दिवसातच जवळपास 4 लाख व्ह्यूजचा टप्पा या ट्रेलरने पार केला आहे. 27 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

करीना, कियारा डिसेंबरमध्ये देणार 'गुड न्यूज' 

Tanhaji : 'मैं आपको हारने नहीं दूंगी'; काजोल दिसणार मराठमोळ्या रूपात

अक्षय-करिना, दिलजीत-कियारा या जोड्यांनी 'गुड न्यूज'मध्ये धुमाकूळ घातला आहे. बात्रा व्हर्सेस बात्रा अशा दोन कुटूंबांमधला मजेदार वाद या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. आयव्हीएफ यंत्रणेद्वारे करिना व कियारा या दोघींना गर्भधारणा होते, मात्र नंतर लक्षात येते की करिनाचे मूल हे दिलजीतचे आहे व कियाराचे मूल हे अक्षयचे आहे. या गोंधळामुळे काय धमाल उडते, ही दोन्ही बाळं कशी जन्माला येतात याची मजा दाखविणारा हा चित्रपट असेल. गुड न्यूजच्या केवळ ट्रेलरनेच प्रेक्षकांना वेड लावलंय, यावरून चित्रपट कसा असेल याची कल्पना करू शकता. राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज याआधी पंजाबी सिनेंमांमधून दिसला आहे. बॉलिवूडमध्ये सिंग इज ब्लिंग, फिलॉरी, उडता पंजाब असे काही सुपरहिट चित्रपट त्याने केले. आता तो 'गूड न्यूज' च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कियाराचा कबीर सिंगमधील अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला आणि तिला भरपूर पसंती मिळाली. कियाराने नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरी' या चित्रपटातून काम केलं आणि त्यातील तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली. त्यामध्ये ती अभिनेता विकी कौशलसोबत दिसली होती.

Laal Singh Chaddha : 'सत् श्री अकालजी, मायसेल्फ लालसिंग चढ्ढा!'

9 वर्षांनतर एकत्र दिसणार करीना आणि अक्षय
खिलाडी कुमार आणि बेबो मुख्य भूमिकेत 'गुड न्यूज' सिनेमातून दिसणार आहेत. याआधी हे दोघ 2009 मध्ये आलेल्या 'कमबख्त इश्क' या चित्रपटातून एकत्र दिसले होते. त्यानंतर  'गुड न्यूज' च्या निमित्ताने बेबो आणि अक्षय 9 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शन या सिनेमाचं निर्देशन करीत आहे. चित्रपटाची कधा 'सरोगसी' वर आधारीत असणार आहे. याआधी 2002 मध्ये याच विषयावर मेघना गुलजार यांनी ' फिलहाल' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
https://www.esakal.com/mukhya-news
https://www.esakal.com/live-updates/marathi-breaking-news  
https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi movie Good Newwz trailer released