पन्नासावा बर्थडे गजेंद्र अहिरेंसाठी असणार स्पेशल; 'हे' आहे खास कारण!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

त्याचे चित्रपट महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि जगातील विविध चित्रपट महोत्सवात गौरविले गेले आहेत. त्याचा 'डिअर मॉली' हा इंग्रजी चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतही दाखल झाला होता.

मुंबई : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेणारा मराठी दिग्दर्शक म्हणजे गजेंद्र अहिरे. आतापर्यंत त्याने विविध विषयांवर चित्रपट बनविले आहेत. विशेष म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर आधारित वास्तववादी चित्रपट बनविण्यात त्याचा हातखंडा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता गजेंद्र अहिरे येत्या रविवारी (ता. 16) पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पन्नासाव्या वर्षात त्याने पन्नास चित्रपट बनविले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला मिळालेली चित्रपटांची ही सुवर्णभेटच आहे.

- 'घटस्फोटातून मी अजुनही सावरत आहे' दिया मिर्जाचा पहिल्यांदाच खुलासा

'कृष्णाकाठची मीरा' हा गजेंद्रचा दिग्दर्शक म्हणून पहिला मराठी चित्रपट. कथा, पटकथा-संवाद लेखनाबरोबरच या चित्रपटाची गीतेही गजेंद्रने लिहिली. 2003 साली आलेल्या 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' या चित्रपटामुळे त्याला दिग्दर्शक म्हणून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर त्याची मराठी चित्रपटसृष्टीत घौडदौड सुरुच राहिली. त्यानंतर 'शेवरी', 'बयो', 'गुलमोहर', 'बायोस्कोप', 'अनुमती', 'ट्युरिंग टॉकिज' असे अनेक चित्रपट त्याने बनविले.

- 'मै आपके साथ हूँ भी और नहीं भी' कॅन्सरशी लढा देणाऱ्या इरफानचा व्हिडीओ पाहाच

मराठीमध्ये वाटचाल सुरु असतानाच त्यांने हिंदी तसेच इंग्रजी चित्रपटही बनविले. आतापर्यंत त्याला चित्रपटांसाठी 19 राज्य पुरस्कार, 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्या 'द सायलेन्स' चित्रपटाने तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. त्याचे चित्रपट महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि जगातील विविध चित्रपट महोत्सवात गौरविले गेले आहेत. त्याचा 'डिअर मॉली' हा इंग्रजी चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतही दाखल झाला होता.

गजेंद्रचा 'बीडी बाकडा' हा पन्नासावा चित्रपट पूर्ण झाला आहे. हा चित्रपट हिंदी असून यामध्ये गोविंद नामदेव, सीमा विश्‍वास यांसारखे कलाकार आहेत. सामाजिक विषयावरील हा चित्रपट आहे.

- ऑस्कर विजेत्या 'पॅरासाइट' ने चोरली तमिळच्या 'या' सिनेमाची कथा ?

चित्रपटसृष्टीतील आपल्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीनिमित्त गजेंद्र म्हणतो, 'माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी मला माझे पन्नास चित्रपट पूर्ण करायचे होते आणि आता अगदी तसंच घडलं आहे. माझ्या करिअरमधील संपूर्ण पन्नास चित्रपट पूर्ण होण्यामागे माझे कलावंत, निर्माते, तंत्रज्ञ यांचे कष्ट आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Gajendra Ahire will give surprise to his fans on 50th Birthday