अखेर 'त्या' प्रकरणावर एकता कपूरने सोडले मौन, म्हटली की...

अखेर 'त्या' प्रकरणावर एकता कपूरने सोडले मौन, म्हटली की...
Updated on

मुंबई ः एकता कपूरला छोट्या पडद्यावरची क्वीन म्हटली जाते. छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक सरस मालिका बनवून तिने मालिका विश्वात चांगलेच नाव कमावले. अनेक नवोदित कलाकारांना तिने आपल्या मालिकांमध्ये संधी दिली आणि स्टार बनविले. मात्र आता एकता कपूर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे आणि त्याबाबतचा खुलासा करून या वादाबाबत आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी एकता कपूरची 'ट्रिपल एक्स' ही वेबसीरीज तिच्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित झाली आणि त्यातील काही वादग्रस्त सीन्समुळे एकताला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या वेबसीरिजमध्ये भारतीय जवानांचा अपमान केल्याचं हिंदुस्तानी भाऊ या युट्युबरने म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एकताला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र अखेर या प्रकरणी एकताने आपले  मौन सोडलं आहे आणि आपले  मत व्यक्त केलं आहे.

एका मुलाखतीमध्ये एकताने आपले मत व्यक्त केले आहे. तिच्यावर केले गेलेले आरोप आणि तिला देण्यात आलेल्या धमक्यांबाबत तसेच भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्याविषयीदेखील तिने स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 यामध्ये तिने असे म्हटले आहे, की आम्ही या देशाचेनागरिक आहोत आणि या समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे भारतीय सैन्याबद्दल आमच्या मनात कायम आदर आहे. आपल्या देशासाठी आणि सुरक्षिततेसाठी ते सतत झटत असतात. ज्या दृश्यांबद्दल बोलले जात आहे ती आम्ही आधीच हटविली आहेत. आमच्या बाजूने आम्ही योग्य ती कारवाई केली आहे. आम्ही योग्य ती पावले उचलली आहेत. मात्र तरीही काही जण आम्हाला धमकी देत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे”,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com