Ekta Kapoor Emmy: एकता कपूरचा जागतिक स्तरावर डंका! ठरली एमी अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला

International Emmy Awards 2023:
International Emmy Awards 2023: Ekta Kapoor Emmy:

International Emmy Awards 2023: बॉलीवूडचे दिग्गज कलाकार जितेंद्र यांची लेक एकता कपूर ही टिव्ही इंडस्ट्रीची मोस्ट पावरफूल पर्सनॅलिटी आहे. तिला टिव्ही क्षेत्रातील क्विन म्हटलं जातं. टेलिव्हिजन प्रोडक्शन बालाजी टेलिफिल्म्सची सह-संस्थापक असलेल्या एकताला कंटेंट क्वीन म्हणुन देखील ओळखलं जातं.

केवळ टिव्ही विश्वच नाही तर चित्रपटांमध्येही एकता कपूरने निर्माता आणि दिग्दर्शक म्हणुन वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता एकता कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एकताला जागतिक स्तरावर एमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

International Emmy Awards 2023:
Hemangi Kavi: २ सप्टेंबरला हेमांगी कवीचं स्वप्न पूर्ण होणार.. सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023 जिंकणाऱ्या विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. हा पुरस्कार एकता कपूरने जिंकला आहे. आता एकता कपूरला 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 51 व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल. पेसनर यांनी ही घोषणा केली. सीईओ ब्रूस एल पेसनर यांनीही एकता कपूरचे कौतुक केले आहे. यासोबतच हा पुरस्कार जिंकणारी एकता ही पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली आहे.

International Emmy Awards 2023:
Shweta Mehendale: हातात जळता कापूर अन् उरी कल्लोळ.. मराठमोळ्या श्वेताचा थरारक Video बघाच

हा पुरस्कार मिळाल्यानंतर एकताने पोस्ट शेयर करत लिहिले की, "हा सन्मान मिळाल्याने मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. जागतिक व्यासपीठावर मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. "

एमी अवॉर्ड व्यतिरिक्त एकता कपूरचा फॉर्च्यून इंडियासाठी आशियातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com