Review; पब,डान्स शो, वेळ उरला तर 'संसार';करण जोहरचा 'केविलवाणा' प्रयत्न

युगंधर ताजणे
Sunday, 29 November 2020

नेटफ्लिक्सवर दिग्दर्शक करण जोहरची Fabulous Lives Of Bollywood Wives ही मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यात सेलिब्रेटी कलाकारांच्या पत्नींची कथा मांडण्यात आली आहे.

 मुंबई - आपला आवडता कलाकार काय करतो, त्याला काय आवडते, तो कसा राहतो याविषयी त्या कलाकाराच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. अशावेळी त्याचं खासगी आयुष्यही हे वैयक्तिक न राहता सार्वजनिक पातळीवर येऊ लागते. हे प्रकार हल्ली सोशल मीडियातून पाहायला मिळते.

नेटफ्लिक्सवर दिग्दर्शक करण जोहरची Fabulous Lives Of Bollywood Wives ही मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यात सेलिब्रेटी कलाकारांच्या पत्नींची कथा मांडण्यात आली आहे.अर्थात त्यातून करणला नेमकं काय सांगायचे आहे हे काही कळायला मार्ग नाही. आपण जे काही पाहतो ते सारं 'अपने बस की बात नही' असं वाटायला लावणारं आहे.

स्टार कलाकार, त्याचं खासगी आयुष्य कसं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. चित्रपटात जसा हिरो बायकोला ओरडतो, धमकावतो, वाट्टेल तसा बोलतो हे सारं त्याच्या ख-या आयुष्यातही होतं असेल का, आपल्या पत्नीला तो घरकामात मदत करत असेल का अशा प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही या मालिकेत शोधायला जाणार असाल तर तुमच्या हाती निराशेशिवाय काही लागणार नाही. मुळात या मालिकेचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग करणने डोळ्यासमोर ठेवला आहे का, असा प्रश्न Fabulous Lives Of Bollywood Wives  ही मालिका पाहिल्यावर पडतो. यात दाखविण्यात आलेल्य़ा सेलिब्रेटींच्या पत्नी या दिवसभर फिरतात, मुलाखती देतात, किट्टी पार्टी करतात, कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यातून वेळ मिळाला तर घरकामात लक्ष देतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

गेल्या काही दिवसांपूर्वी फोर मोअर शॉटस प्लीज नावाची एक मालिका अॅमेझॉनवर प्रदर्शित झाली होती. त्यातील त्या चार नायिका मुक्तपणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आयुष्याचा आनंद लुटताना दाखविण्यात आल्या आहेत. काही अंशी ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली होती. Fabulous Lives Of Bollywood Wives  यातही चार बायकांची गोष्ट सांगण्यात आली आहे. त्यात चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे, संजय कपूरची पत्नी महिप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि समीर सोनीची पत्नी निलम कोठारी यांचा समावेश आहे. या त्या सेलिब्रेटी व्हाईव्ज आहेत. चित्रपटांच्या झगमगाटी आयुष्याशिवाय दुसरं काही शोधण्याचा त्यांचा प्रयत्न या मालिकेत दाखविण्यात आला आहे.

भारी कोण ?;पेले की मॅरेडोना..

भावना पांडेने फॅशनची लाईन निवडली, महीपने घराकडे लक्ष द्यायचं असे म्हणून अॅक्टिंग सोडली तर सीमा ही फॅशनच्या क्षेत्रात व्यस्त आहे.1980 च्या दशकात आपलं करिअर सुरु करणा-या नीलमनं अभिनेता आणि दिग्दर्शक समिर सोनी याच्यासोबत लग्न केलं. आता ती ज्वेलरी व्यावसायिक आहे.  एका अभिनेत्याची पत्नी, काय करत असेल, तिचं दैनंदिन जीवन कसे असेल याबद्दल कित्येकांना कुतूहल आहे.

हे ही वाचा: ड्रग केसमध्ये जामिन मिळाल्यानंतर सेटवर परतली भारती सिंह, पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट  

या मालिकेत जे त्या मोठमोठ्या पार्टया झोडताना, पबमध्ये बसलेल्या, मुक्तपणे बडबडणा-या आणि मनात येईल तसं वागणा-या आहेत. हे सगळं पाहताना आश्चर्यही वाटतं. या गोष्टी करायला त्यांना वेळ कसा मिळतो. ते आपल्या कुटूंबातील सदस्यांशी कधी बोलतात. मुलांबाळांची कशाप्रकारे काळजी घेतात. हे सारे प्रश्न मालिका पाहिल्यावर पडतात. पण ज्यापध्दतीनं मांडणी करण्यात आली आहे ते पाहुन हताश व्हायला होते. 

'रंग झाला फिका अन् कोणी देईना मुका'; सरु आजीच्या डेंजर म्हणी

मुळात ही संकल्पना आपली नाही. अमेरिकेतील टिव्ही शोवरील एका कार्यक्रमावर आधारित असल्याचे बोलले जाते. Fabulous Lives Of Bollywood Wives या मालिकेचे एकूण आठ भाग आहेत. मात्र त्यात रियॅलिटी कुठेही डोकावत नाही हे विशेष. ते चित्रण फार गुळगुळीत आणि बुळबुळीत स्वरुपाचे झाले आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fabulous Lives Of Bollywood Wives Review