फरहान अख्तरची सायकल रस्त्यात झाली पंक्चर; युजर्स म्हणाले, भाग मिल्खा भाग

फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे
Farhan Akhtar Latest News
Farhan Akhtar Latest NewsFarhan Akhtar Latest News
Updated on

Farhan Akhtar Latest News ज्याप्रमाणे सामान्य माणूस स्टारसारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहतो, त्याचप्रमाणे सेलिब्रिटींनाही काही वेळा सर्वसामान्यांसारखे मोकळेपणाने फिरावसं वाटते. त्यांना असे करणे नेहमीच शक्य नसते. कारण, ते जिथे जातात तिथे लोक त्यांना घेरतात. याशिवाय त्यांना सुरक्षेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते. मात्र, अनेकवेळा सेलिब्रिटी काही ना काही युक्ती वापरून सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याची इच्छा पूर्ण करतात. असाच प्रयत्न फरहान अख्तरने (Farhan Akhtar) केला आणि फसला.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने अलीकडेच ऑटो राईडचा आनंद लुटला आणि त्याने हे छायाचित्र सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले. फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सायकलसह ऑटो रिक्षात बसलेला दिसत आहे. इथपर्यंत ठीक आहे. परंतु, फरहान अख्तरला सायकल घेऊन ऑटोरिक्षात बसावे लागल्यानंतर काय झाले?

‘टायर पंक्चर झाल्यामुळे रविवारची सायकल राइड अर्धवट सोडावी लागली. या ऑटोमध्‍ये मजा करण्‍यासाठी आणि शौर्य सोडण्‍यासाठी एवढेच पुरेसे आहे’ असे फरहान अख्तरने (Farhan Akhtar) कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Farhan Akhtar Latest News
...अन् कंगना राणावत फसली; गोमांस खाल्याची जुनी मुलाखत व्हायरल

फरहान अख्तरच्या पोस्टवर असंख्य चाहते आणि सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या झोया अख्तरने फरहान अख्तरच्या या पोस्टवर हसणारा इमोजी टाकून लिहिले, ‘मुंबई है’. फरहान अख्तरच्या या पोस्टवर ईशान खट्टरनेही हसणारा इमोजी टाकला आहे. एका युजरने लिहिले, ‘भाग मिल्खा भाग’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com