esakal | Filhaal 2 Out: अक्षय झाला भलताच सेंटी, नुसताच रडतोय...
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar

Filhaal 2 Out: अक्षय झाला भलताच सेंटी, नुसताच रडतोय...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (bollywood khiladi akshay kumar) बहुचर्चित फिलहाल (filhaal 2) या गाण्याचा दुसरा भाग आता प्रदर्शित झाला आहे. त्यात अक्षयच्या अभियनाला प्रेक्षकांची दाद मिळताना दिसत आहे. 2019 मध्ये अक्षय आणि नुपुर सेननचा (nupur sanon) एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. ते गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होत. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा भाग कधी येणार अशी विचारणा चाहते अक्षयला करत होते. अखेर त्या गाण्याचा सिक्वेल सोशल मीडियावर रिलिज झाला आहे. कमी वेळेत त्याला लाखो लाईक्स आणि व्ह्युजही मिळाले आहेत. (filhaal 2 song out now akshay kumar acting will make you cry)

फिलहाल 2 (filhaal 2) मध्ये अक्षयनं कमाल केली आहे. त्याच्या हटकेपणाचं सध्या कौतूक होताना दिसत आहे. तो व्हिडिओ शेयर करताना अक्षयनं लिहिलं आहे की, फिलहाल माझा पहिला म्युझिक व्हिडिओ आता प्रदर्शित झाला आहे. मी त्याच्यासाठी फारच उत्सुक होतो. आशा करतो की, तुम्हा सगळ्यांना देखील तो फार आवडेल. हे गाणं प्रदर्शित झाले आहे. तुम्हाला ते कसे वाटते हे जरुर सांगा. या शब्दांत अक्षयनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री नुपुरनंही या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या गाण्यामध्ये अक्षय सुंदक दिसतो आहे. तर वधूच्या भूमिकेत नुपुर सेननंही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याचे एक वेगळे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास त्यात अक्षय कुमार भलताच सेंटी झाला आहे. त्या गाण्यात तो चक्क रडताना दिसतो आहे. त्याचा हा वेगळ्या प्रकारचा लूक चाहत्यांना विशेष भावला आहे. या गाण्याला प्राकनं गायलं आहे. गाण्याचे संगीत देखील चाहत्यांना आवडले आहे

हेही वाचा: ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक

हेही वाचा: 'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

अक्षय आणि नुपुरच्या पहिल्या गाण्याला देखील उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचा पहिला भाग हिट झाला होता. त्या गाण्यामध्ये दोन प्रेमी आपलं प्रेम आणि विरह व्यक्त करतात. वेगळं झाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा भेट होते. त्यांची भेट, यासारख्या अनेक गोष्टींची उत्तरं ही प्रेक्षकांना गाण्याच्या दुसऱ्या भागात भेटतात. फिलहालच्या दुसऱ्या भागात त्यांचे प्रेम संपल्याचे दाखविण्यात आले आहे.

loading image