
Ganesh Chaturthi : सलमानसाठी आईचं 'बाप्पां'कडे साकडे, घरी केली विशेष पूजा
Ganesh Chaturthi 2022 : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान या वर्षी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गणेश चतुर्थी 2022 साजरी (Ganesh Chaturthi) करणार आहे. दबंग खान गेल्या वर्षी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर होता. त्यामुळे तो कुटुंबासह पूजेत सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, या वर्षी तो त्याची बहीण अर्पिताच्या घरी गणपती पूजेत सहभागी होणार आहे.
सलमानच्या घरी गणपती आला
दरवर्षी गणपती दीड दिवसांसाठी सलमान खानच्या घरी येतो. त्यानंतर त्याला पूर्ण प्रेम आणि आदराने निरोप दिला जातो. दबंग खानसाठी अलीकडचा काळ फारसा चांगला नसल्यामुळे यावर्षी सलमान खानच्या (Salman Khan) आईनेही पूजावर खूप जोर दिल्याचे वृत्त आहे.
आईने ठेवली खास पूजा
सूत्रांनुसार, सलमान खान या वर्षी महोत्सवात सहभागी होणार आहे आणि त्याचे कुटुंब एकत्र भेटीसाठी खूप उत्सुक आहे. एकीकडे सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि सुरक्षेसाठी त्याला शस्त्रे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे सलमान खानची आई सलमा खान आपल्या मुलाबद्दल खूप चिंतेत आहे आणि तिने त्याच्यासाठी बाप्पांची खास पूजेचे आयोजन केले होते.
सलमान खान हा गणपती भक्त
रिपोर्टनुसार, 'गणपती वाईटापासून रक्षण करतो आणि खान कुटुंब नेहमीच गणेशाचे भक्त राहिले आहे. त्यामुळे सलमान खानची आई सलमा हिने खास पूजा आयोजित केली होती. सलमान खान कुटुंबात सर्वात प्रिय आहे आणि त्याची आई सलमा खानने नेहमीच त्याला त्याच्या सभोवतालच्या नकारात्मकतेपासून वाचवले आहे.