Marathi Movie: 'हर हर महादेव' अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही!

शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत: दुसरा टिझर प्रदर्शित
Marathi Movie
Har Har Mahadev
Sharad Kelkar
Marathi Movie Har Har Mahadev Sharad Kelkaresakal

सध्या मराठी चित्रपटसृष्टी जोरावर आहे.मग ते प्रेम कथा असो वा ऐतिहासिक कथा...असाच एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या ‘हर हर महादेव’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या पहिल्या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला आहे. दरम्यान आता 'हर हर महादेव'च्या निर्मात्यांनी शरद केळकर यांनी साकारलेल्या बाजीप्रभूंच्या दमदार आणि कणखर  व्यक्तिरेखेने सर्वांना प्रभावित करण्यासाठी दुसरा टीझर प्रदर्शित केलाय.

हा टिझरमध्ये बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली झालेल्या पावणखिंडीचा थरारक प्रसंगाची झलक दाखवली आहे.हा टिझर तुमच्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेसा आहे. खऱ्या लढ्याची प्रेरणादायी कथा मांडण्यासाठी सज्ज असताना, या टीझरमध्ये तुम्हाला यूद्धांचा अनुभव येतोय.

'हर हर महादेव' हा मराठीतील पहिला बहुभाषिक चित्रपट आहे जो बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली आपल्या इतिहासातील एका खऱ्या लढाईची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे, जिथे केवळ 300 सैनिकांनी यूदधातील विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. 12000 शत्रू सैन्याविरुद्ध जोरदार लढा दिला आणि जिंकले.

Marathi Movie
Har Har Mahadev
Sharad Kelkar
Har Har Mahadev: शिवमणी यांच्या दमदार तालवादनात झालं 'हर हर महादेव'चं म्युझिक लॉंच

प्रतिभावंत आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळख असलेले शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभूची भूमिका साकारतांना दिसणार आहे, या नवीन टीझरद्वारे आपण अभिनेत्याच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक पाहू शकतो . या टीझरमध्ये त्यांच्या जोरदार गर्जनेपासून ते जिंकण्याच्या त्याच्या इच्छेपर्यंत बाजीप्रभूंची व्यक्तिरेखा शरद केळकर यांनी अतिशय दमदारपणे साकारली असल्याचे दिसते.

या चित्रपटाने रिलीज होण्यापुर्वी एक मोठा इतिहास रचला आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असेल. हा चित्रपट एका खऱ्या लढाईची प्रेरणादायी कथा आहे.

झी स्टुडिओ निर्मित असलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद केळकर बाजी प्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत तर अभिनेत्री अमृता खानविलकर खंबीर सोनाबाईंची भूमिका साकारणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com