शालीन भनोट सुम्बुलवर तापला; शिव्या दिल्या,लाथ मारली आणि मग....Bigg Boss 16, Shalin and Sumbul argument | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Shalin Bhanot anger on sumbul touqueer khan kick on a table and actress fell ill

Bigg Boss 16: शालीन भनोट सुम्बुलवर तापला; शिव्या दिल्या,लाथ मारली आणि मग...

BIgg Boss 16: बिग बॉस 16 मध्ये शालीन भनोट,टीना दत्ता आणि सुम्बुल तौकीर खान यांच्यात सध्या प्रेमाचा त्रिकोण रंगताना दिसत आहे. कधी शालीन टीनाशी जवळीक साधतो तेव्हा सुम्बुलची तळपायाची आग मस्तकात जाते. तर कधी शालीन सुम्बुलशी गप्पांमध्ये रंगतो तेव्हा टीनाचा जळफळाट होताना दिसतो. (Bigg Boss 16 Shalin Bhanot anger on sumbul touqueer khan kick on a table and actress fell ill)

हेही वाचा: Movie Release: या वीकेन्डला मोठा धमाका... 12 सिनेमे-वेबसिरीज एकाच दिवशी रिलीज, संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

आता शो चा एक प्रोमो समोर आला आहे,ज्याला पाहून प्रेक्षक हैराण झालेयत. प्रोमो मध्ये आपण पाहू शकाल की शालीन भनोट इतर घरातील सदस्यांसोबत लीव्हिंग रुममध्ये बसला आहे. तेव्हा कशावर तरी चर्चा सुरु होते आणि शालीन सुम्बुलवर भडकतो. आणि बोलू लागतो की आमच्याविषयी काय नको त्या गोष्टी बोलताय? दूर रहा आमच्यापासून. डोकं फिरलंय का? यानंतर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या कुठल्यातरी वस्तूला शालीन लाथ मारून उडवतो. तर टीना रागानं भिंतीवर एक जोराचा पंच मारते. माझ्या कॅरेक्टरविषयी घाणेरडं बोलतायत काहीतरी असं चिडून म्हणते.

तेव्हा सुम्बुल रडत-रडत शालीन जवळ येते आणि बोलते की याच्यातील अर्ध्याहून अधिक गोष्टी मी नाही बोललेय. तेव्हा मात्र शालीनचा भडका उडतो आणि सुम्बुल पुन्हा जोरानं रडू लागते. आणि मग तिची तब्येत बिघडते. ती इतकं रडते की तिला श्वासही घ्यायला त्रास होतो. तेव्हा निमृत कौर बिग बॉसला विनंती करते की सुम्बुलला मेडिकल रुममध्ये न्यावं लागेल उपचारासाठी.

हेही वाचा: Animal Movie Look: लांबसडक केस,रक्तानं माखलेला चेहरा अन् कापलेलं नाक...इतका खतरनाक पहिल्यांदाच दिसला रणबीर

या व्हिडीओला शेअर करत मेकर्सनं लिहिलं आहे की, ''शालीनला आला राग, काय घडतंय सुम्बुल आणि टीनामध्ये?'' या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. कोणी टीनाला चुकीचं म्हणतोय,तर कुणी शालीन भनोटला दोष देताना दिसतोय की फक्त प्रसिद्धीसाठी तो सुम्बुलचा चुकीचा वापर करत आहे. टीनाविषयी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'ती खूप घाणेरडा गेम खेळतेय'. आता पाहायचं की शालीन आणि टीनाच्या वागण्यावर सलमान खान 'वीकेंड का वार' मध्ये त्यांची कशी शाळा घेतोय.

सुम्बुलच्या वडीलांनी काही दिवस आधी आपल्या मुलीशी बोलताना टीना आणि शालीनसाठी चुकीच्या शब्दांचा वापर केला होता. यानंतर सुम्बुलच्या वडीलांना ट्रोलही केलं गेलं होतं. ट्रोलिंग नंतर सुम्बुलच्या वडीलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की,''मी सुम्बुलविषयी खूपच संवेदनशील आहे. तिची मी प्रमाणापेक्षा जास्त काळजी करतो. जेव्हा सुम्बुलला बिग बॉसची ऑफर आली होती तेव्हा मला वाटलं होतं हा शो तिच्यासाठी योग्य राहील. या शो मध्ये येऊन तिला जगाची ओळख होईल. दुनियादारी कळेल. नाहीतर याआधी ना मी,ना सुम्बुल आमच्यापैकी कुणीही हा शो पाहिला नव्हता फारसा. पण आज मला खूप पश्चाताप होत आहे की मी माझ्या मुलीला या शो मध्ये पाठवले. यामुळे तिचं खूप नुकसान झालं''.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Samantha: 'समंथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालीच नाही,ती तर... ', आजारी अभिनेत्रीच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

सुम्बुलचे वडील पुढे म्हणाले,''मला माहित आहे सुम्बुलवर तिचे चाहते खूप प्रेम करतात. पण मला वाटतं की आता तिनं आता हा शो सोडायला हवा. जी मुलगी बिग बॉसच्या घरात आहे,ती माझी मुलगी नाहीच मुळी. ती आपल्यातील सकारात्मकता,आनंद सगळं विसरत चाललीय. आणि म्हणून मी तिच्या चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी सुम्बुलला वोट करू नये. प्रार्थना करतो की या शनिवारी ती घराच्या बाहेर येऊ दे''.

हेही वाचा: KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

सुम्बुलच्या वडीलांची तब्येत मध्ये बरी नसल्यानं बिग बॉसनं सुम्बुलसोबत त्यांचे बोलणे करुन दिले होते. यावेळी सुम्बुलच्या वडीलांनी रागाच्या भरात शालीन आणि टीनाला त्यांची लायकी दाखवून दे असं आपल्या मुलीला सांगितलं होतं.