काय म्हणायचं अशा प्रेमाला! 81 वर्षांचा जगप्रसिद्ध अभिनेता, त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेंड|Hollywood 81 years old Al Pachino actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Al Pachino

प्रेमाला वय नसतं! 81 वर्षांच्या जगप्रसिद्ध अभिनेत्याची 28 वर्षांची गर्लफ्रेंड

Bollywood News - प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हणून ठेवलं आहे. सेम असणाऱ्या प्रेमात वयाचं (Hollywood News) बंधनही नसतं असंही म्हटलं जातं. खासकरुन मनोरंजनाच्या क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या बाबत बोलायचे झाल्यास त्यांना आवडणारी व्यक्ती ही (Love Story) त्यांच्या वयाची असेल असं काही बंधन नाही. आता हॉलीवूडच्या एका जगप्रसिद्ध अभिनेत्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या अभिनेत्याला सारं जगं अल (Oscar Nominations) पचिनो (Al Pacino) या नावानं ओळखतं. त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल झाला आहे. सध्या अल पचिनो यांच वय 81 वर्ष आहे. तर त्यांच्या गर्लफ्रेंडचं 28 वर्षे. त्यामुळे त्यांच्या या अनोख्या प्रेमाची कथा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

यापूर्वी देखील अल पचिनो हे वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. त्यांना जगप्रसिद्ध अशा ऑस्कर पुरस्कारानं (Oscar Awards) देखील गौरविण्य़ात आले होते. 81 वर्षांच्या अल पचीनो यांच्या गर्लफ्रेंडचं नाव नुर अलफलाह असे आहे. यापूर्वी अल पचिनो त्यांच्या वेगवेगळ्या रिलेशनशिपवरुन चाहत्यांच्या केंद्रस्थानी होते. हॉलीवूडचे स्टार अभिनेते अल पचीनो यांची गॉडफादर मधील भूमिका ही नेहमीच सर्वोत्कृष्ठ अभिनयाचे उदाहरण म्हणून सांगितली जाते. याशिवाय त्यांच्या इतर चित्रपटांतील भूमिकांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या ते त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आले आहेत. नुर अलफलाह (Noor Alfallah) समवेत त्यांचे फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहेत. त्यांनी त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे.

हेही वाचा: KGF 2 Song Viral: यशचा 'सुलतान' अवतार नेटकऱ्यांना भावला, सोशल मीडियावर चर्चा

बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे त्यांच्या हटकेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या राहणीमानाची, रिलेशनशिपची चर्चाही होत असते. गॉडफादर फेम अल पचीनो हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांचा चाहतावर्ग हा जगभर पसरला आहे. त्यासाठी त्यांना ऑस्कर सारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ते सध्या 28 वर्षांच्या नुरला डेट करत आहे. नुर ही प्रसिद्ध टीव्ही प्रोड्युसर आहे. ती मुळची कुवेतची असून अमेरिकेमध्ये तिचं शिक्षण झालं आहे. यापूर्वी नुरनं तिच्यापेक्षा वयानं 36 वर्षे मोठ्या असणाऱ्या माईक जॅगला डेट केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

हेही वाचा: IPL Photo Viral: मैदानावर दिसला छोटा 'फ्युचर धोनी'

Web Title: Hollywood 81 Years Old Al Pachino Actor Dating 28 Years Girlfriend Nooe Alfallah Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top