वडिलांकडून मिळालं 'स्वातंत्र्य', अभिनेत्रीचा विवस्त्र होवून आनंद साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Britney Spears
वडिलांकडून मिळालं 'स्वातंत्र्य', अभिनेत्रीचा विवस्त्र होवून आनंद साजरा

वडिलांकडून मिळालं 'स्वातंत्र्य', अभिनेत्रीचा विवस्त्र होवून आनंद साजरा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नेहमीच वादाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिला आहे. त्यावरुन अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावरुन आपली बाजू मांडताना दिसतात. आता हॉलीवूडमधील सेलिब्रेटी प्रख्यात गायिका ब्रिटनी स्पियर्स (Britney Spears) ही तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. ती वादग्रस्तही आहे. गेल्या काही दिवसांपासून तिनं वडिलांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. वडिलांनी तिला आपल्या संपत्तीपासून बेदखल तर केलेच मात्र तिच्यावर काही निर्बंधही आणले होते. त्याविरोधात दाद मागण्यासाठी ब्रिटनी कोर्टात गेली होती. अखेर तिला न्याय मिळाला आहे. मात्र त्या गोष्टीचा आनंद साजरा करताना तिचं भान सुटलं आहे.

सध्या ब्रिटनी 'फ्री वुमन एनर्जी' (Free Woman Energy) चा आनंद घेताना दिसत आहे. काही दिवसांपासून तिनं याविषयी कोर्टामध्ये लढा दिला होता. आता तिनं चक्क न्युड फोटो (Britney Spears Nude Mirror Selfie) सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिच्या या अजब कृतीनं चाहते आणि नेटकरी थक्क झाले आहेत. त्यांनी तिला गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी आता आम्हाला कळते की, वडिलांनी तुला सुट का दिली नाही याचे कारण समजल्याची प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांच्या जाचक अटींपासून ब्रिटनीला मुक्तता मिळाली आहे. त्यानंतर तिनं आपल्या नवीन स्वातंत्र्याचा आनंद वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात ते फोटो शेयर करताना ते एडिट करण्यात आले आहेत.

हेही वाचा: Happy Birthday Amitabh Bachchan : बच्चन यांच्या इन्स्पेक्टर विजयला पोलिसांचा ट्विटर सॅल्यूट

प्रसिद्ध गायिकेनं आपल्या या स्वातंत्र्याची तुलना (Free Woman Energy) अशा पद्धतीनं केली आहे. जेणेकरुन आपल्याला देशातील महिलांची मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळावी असा त्यामागील उद्देश आहे. 40 वर्षीय ब्रिटनीचा गेल्या काही वर्षांपासून वडिलांच्या विरोधात कायदेशीर लढा सुरु होता. आता तिला वडिलांच्या त्या जाचक अटींपासून मुक्तता मिळाली आहे. तिनं आपल्या पोस्टला दिलेल्या त्या कॅप्शनमधून वडिलांना उद्देशुन ते लिहिल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top