Happy Birthday Amitabh Bachchan : बच्चन यांच्या इन्स्पेक्टर विजयला पोलिसांचा ट्विटर सॅल्यूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Police and Maharashtra Police tweets about Amitabh Bachchan on his birthday

पुणे पोलिसांनी अमिताभ बच्चन यांना अगदी त्यांच्यासारख्याच ग्रेट शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरून पुणे पोलिसांनी आपल्या शुभेच्छा बिग बींपर्यंत पोहोचवल्या आहेत. 

Happy Birthday Amitabh Bachchan : बच्चन यांच्या इन्स्पेक्टर विजयला पोलिसांचा ट्विटर सॅल्यूट

पुणे : महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस! जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच पुणेकर बिंग बींना शुभेच्छा देण्यात कसे मागे राहतील? पुणेकर म्हणलं की हटके गोष्टी आल्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी अमिताभ बच्चन यांना अगदी त्यांच्यासारख्याच ग्रेट शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरून पुणे पोलिसांनी आपल्या शुभेच्छा बिग बींपर्यंत पोहोचवल्या आहेत.

अन् 'त्या' रात्री असे काय घडलं ज्यामुळे अमिताभपासून रेखा दूर झाल्या 

'अँग्री यंग मॅन' अमिताभ यांच्या सर्वाधिक गाजलेल्या भूमिका म्हणजे पोलिसांच्या! खाकी, जंजीर, बंटी और बबली, शहेनशहा, देव अशा अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये अमिताभने पोलिसांची भूमिका अगदी उत्तमरित्या वठवली आहे. याचीच दखल घेत पुणे पोलिसांनी बिग बींच्या पोलिस भूमिकेतील फोटोंचे कोलाज करून त्याला हटके कॅप्शन दिलंय. 'परंपरा, प्रतिष्ठा आणि शिस्त' हे इंस्पेक्टर विजय यांचे ड्युटीचे तीन स्तंभ आहे. आमच्या आवडत्या ऑनस्क्रीन पोलिस इंस्पेक्टर विजय यांना ७७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' असे कॅप्शन पुणे पोलिसांनी दिलंय. तर महाराष्ट्र पोलिसांनीही अमिताभ यांना आगळ्या-वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Amitabh Bachchan : ही आहेत 'बिग बीं'ची 'Top 10' गाणी!

'बरसात की एक रात' में, ‘कभी कभी’ अगर कोई ‘द ग्रेट गैम्ब्लर’, शहर की सुरक्षा से ‘ हेरा फेरी’ करने की कोशिश करेगा, तो ‘ख़ाकी’ उसे क़ानून की ‘ज़ंजीर’ में ज़रूर ‘गिरफ़्तार’ करेगी। हम आशा करते हैं की आपकी अप्रतिम अदाकारी का ये ‘सिलसिला’ यूँ ही चलता रहे| #HappyBirthdayBigB असे ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. यात अमिताभ यांचा सत्ते पे सत्तामधील फोटो पोस्ट केला आहे.  

जेव्हा रेखा यांच्यामुळे जया बच्चन यांनी राज्यसभेत जागा बदलली!

Web Title: Pune Police And Maharashtra Police Tweets About Amitabh Bachchan His Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top