यो यो हनीसिंगला पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

yo yo honey singh
yo yo honey singhHoney Singh

नागपूर : पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग (Honey Singh) उपाख्य हिरदेश सिंगला अश्लील गाणे गायल्या प्रकरणात ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यामध्ये हजर (Attend the police station) राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने (Sessions Court) दिले आहे. अश्‍लील गाण्यांचे गायन करून ते युट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनी सिंगविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बुधवारी न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

जब्बल यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनी सिंगला (Honey Singh) सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे तो कारागृहाबाहेर आहे. गेल्या जानेवारीमध्ये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणामध्ये पाचपावली पोलिसांना (Attend the police station) हनी सिंगच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी १० जानेवारी २०२२ रोजी हनी सिंगला पत्र पाठवून २५ जानेवारी २०२२ रोजी पोलिस ठाण्यात बोलावले होते.

yo yo honey singh
शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका

मात्र, हनी सिंगने (Honey Singh) त्या पत्राला उत्तर देऊन विविध कारणांमुळे पोलिस ठाण्यात येण्यास असमर्थ असल्याचे कळविले. पोलिसांनी ही बाब अन्य एका संबंधित प्रकरणात सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन हनी सिंग तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. सुनावणी दरम्यान विदेशामध्ये कार्यक्रम सादरीकरणासाठी २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान दुबईला जाण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने (Sessions Court) त्यामध्ये हनी सिंगला (Honey Singh) पाचपावली पोलिस ठाण्यात हजर होण्याचा (Attend the police station) आदेश दिला. तसेच त्याला दुबईत जाण्याची परवानगीही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com