Maharashtra Bhushan Ashok Saraf
Maharashtra Bhushan Ashok Sarafesakal

Maharashtra Bhushan Ashok Saraf : नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

Maharashtra Bhushan Ashok Saraf: अभिनयसम्राट अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Maharashtra Bhushan Ashok Saraf: ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अभिनयसम्राट अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आज महाराष्ट्र भूषण २०२३ वितरण करण्यात आलं. ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आज पार पडला. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. वरळीतीतील एनएससीआय डोममध्ये हा सोहळा पार पडला.

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीवरील अतुलनीय योगदानाबद्दल या अभिनेत्याला राज्याच्या या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.

Maharashtra Bhushan Ashok Saraf
Indrani Mukherjea Docu Series : मुंबई हायकोर्टाचा इंद्राणी मुखर्जी सीरिजला दणका, प्रदर्शन थांबवलं!

अशोक सराफ यांची गणना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जाते. अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने विशेष स्थान मिळवले आहे. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

हम पांच आणि डोंट वरी हो जायेगा सारख्या शोद्वारे त्यांनी प्रेक्षकांना खूप हसवले. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ एका सरकारी बँकेत काम करायचे. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही त्यांनी काही वर्षे बँकेत काम केले. त्यांनी 1974 मध्ये पहिला चित्रपट केला आणि आजही ते मनोरंजनाच्या जगात सक्रिय आहे.

आज प्रदान झालेले पुरस्कार -

सर्वोत्कृष्ट कथा-स्व. स्व.बा. बोरकर (पांघरुण)

सर्वोत्कृष्ट पटकथा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज)

सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णीक (आनंदी गोपाळ)

सर्वोत्कृष्ट गीत- संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत- प्रफुल्ल-स्वप्निल

सर्वोत्कृष्ट संगीत- अमित राज

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -सोनू निगम

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका- मधुरा कुंभार (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- सुभाष नकाशे (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नंदिता पाटकर (बाबा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रोहित फाळके

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- पार्थ भालेराव

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री- अंकिता लांडे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोबरियाल (बाबा)

Maharashtra Bhushan Ashok Saraf
Shaitaan Trailer : 'फक्त १५ मिनिटं थांबा माझ्या फोनची बॅटरी संपलीये'! पण त्यानंतर...'शैतान'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही घाबराल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com