
हृतिक रोशन आणि सुजैन खानवर का भडकले Trollers?
बॉलीवूडमधील एके काळीचं प्रसिद्ध जोडपं म्हणजे हृतिक रोशन आणि सुजैन खान.१३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून खरं तर चाहत्यांना धक्काच बसला होता.कारण या जोडप्याचा घटस्फोट चाहत्यांना अनपेक्षित होता.पण घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुजैन यांच्यात चांगली मैत्री आहे.मात्र या जोडप्याचं असं नेहमी भेटणं ट्रोलर्सला काही आवडलेले दिसत नाही.
एक काळ होता जेव्हा अॅक्शन बॉय हृतिक आणि इंटेरियर डिजायनर सुजैन यांची जोडी आयडियल मानल्या जात होती.घटस्फोटानंतरही हे जोडपे एकमेकांना भेटतात.बऱ्याच गोष्टी शेअर करतात.कदाचित या दोघांच्या भेटण्याचं कारण त्याची दोन मुलं हृदान आणि ह्रहान हेदेखिल असू शकतात.

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हृतिक त्याचा मुलगा हृदानसोबत कारकडे जाताना दिसतोय.काळा टी-शर्ट, डेनिम जीन्स आणि डेनिम शर्टमध्ये अभिनेता पुढे चालताना दिसतोय. सुजैनने कॅप आणि स्टायलिश सनग्लासेस लावले आहेत.दुसरीकडे सुझान कॅज्युअल आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली.(Hritik Roshan) व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी घटस्फोटानंतर भेटल्याबद्दल हृतिक आणि सुझानला ट्रोल केले आहे.'घटस्फोटानंतर आता हे दोघे सोबत तरी कशाला?'असा प्रश्न ट्रोलर्सला पडला.ट्रोलर्सला ते अजिबीत आवडले नाही.रविवारी हृदानच्या वाढदिवसानिमित्त सुझैन आणि हृतिक मुंबईत आपल्या मुलांसोबत लंच डेटवर गेले होते.
काही युजर्सने तर व्हिडिओवर कमेंट केली की, "घटस्फोटानंतरही ते मजा करतात, बॉलीवूडच्या लोकांचा स्वतःचा वेगळा स्वभाव आहे." दुसरा म्हणाला, या लोकांनी लग्नाचे नाटक रचले आहे. तिसर्या यूजरने लिहिले, "इथे किती विचित्र नातं आहे, एकत्र भेटतात, एकत्र जातात, आणि वेगळे झाल्याचा दावा करतात."खरं तर हृतिक रोशन आणि सुझैन खान दोघेही वेगळे झाले तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात खुश असून हृतिक रोशन सबा आझादला डेट करत असल्याची अफवा आहे.तर सुझैन अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते.
Web Title: Hritik Roshans Wife Trolled On Social Mediatrollers Dont Like They Meet Together Sujain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..