
सध्या राजकारणात देशाचा विकास करण्याव्यतिरिक्त सर्व प्रश्नावर वादविवाद सुरु आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'फोटो ऑन नोट' या विधानामुळे जोरदार वाद सुरु झाला आहे. अनेक राजकिय नेत्यानी यावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्यात तर काहींनी नोटांवर कुणाचा फोटो त्यांना हवा आहे,यावर आपलं मत मांडल मात्र केजरीवाल यांच्याकडुन अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असं म्हणत त्याच्यांवर जोरदार टीका होत आहे.
राजकारण्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच त्यांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत. वास्तविक, पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे भारतीय चलन रुपयावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे चित्र लावण्याची मागणी केली होती. यावर सेलिब्रिटींचा आक्षेप आहे. यापूर्वी संगीतकार विशाल ददलानी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती, तर आता गौहर खान यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कमकुवत नेताच म्हटंलं आहे.
यावर गौहर खान हिने देखील केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.यावर ट्विट करत लिहिलयं, ‘एक नेता, जो विकासावर लक्ष केंद्रित करेन असं मला वाटलं होतं, तो राजकारण जिंकण्याच्या शर्यतीत बळी ठरला आहे. सर्वात कमकुवत राजकारणी जे धर्माचा वापर करतायं. राज्याच्या निवडणुका जिंकण्याचा मोह तुम्हाला इतका वेगळा बनवू शकतो, हे खरचं दुःखद आहे. आता तुम्हाला अनफॉलो करण्याची वेळ आली आहे."
टीव्ही अभिनेता नुकल मेहता यांनेही अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाष्य केलंयं. अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांना उत्तर देताना आमदार आतिशी यांनी म्हंटल होतं की, 'तुम्ही वाटतं असल्यास अरविंद केजरीवाल यांचा द्वेष करू शकता, मात्र लक्ष्मीमाता आणि श्रीगणेश यांचा तिरस्कार करू नका. त्याच्या आशीर्वादाची घृणा करु नका'. नकुल मेहताने आतिशीचा हा व्हिडीओ ट्विट करत लिहिलं, 'आणि अखेर... ‘या सगळ्यांनी त्यांची पातळी सोडली’
'आप' कडून निवडूक लढवलेल्या गुल पनाग यांनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे. तिनेही त्यांनी लिहिले, ' त्यातुन काही साध्य झालं असावं किंवा त्याचा अंत असो, प्रत्येक गोष्टीत धर्माला आणने हा एक खेळ झाला आहे,आणि प्रत्येकजण आता तो खेळेलं. आणि फक्त राजकारणीच नव्हे! जे असहमत आहेत ते निरर्थकपणे संविधानाचा वापर करत राहू शकतात.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.