Internatinal Tea Day: चाय की एक चुस्की अन्; बॉलीवूडचे चहा शौकीन कलाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tea Day

Internatinal Tea Day: चाय की एक चुस्की अन्; बॉलीवूडचे चहा शौकीन कलाकार

Tea Day: सकाळी उठल्यावर हवी हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे चहा. जवळपास ९० टक्के लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहा पिऊन करतात. आज टी डे च्या निमित्ताने चहाचे शौकीन असणारे बॉलीवूड कलाकार कोणते ते आपण जाणून घेणार आहोत.

हल्ली चहा लवर सोशल मीडियावर त्यांचं चहा प्रेम व्यक्त करताना दिसतात. अगदी त्याप्रमाणेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीज हे चहा लवर आहेत. चहाशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही.

सोनम कपूर

सोनम कपूर ही चहाप्रेमी असून ती चहावर वेगवेगळे एक्सपिरीमेंट्सही करत असते.

मलायका अरोरा

मलायकाच्या स्लीम आणि फिट बॉडीचे चर्चे सर्वत्र आहे. मलायका फिट राहाण्यासाठी स्ट्रीक्ट डाएट फॉलो करते. मात्र चहाबाबत तिचा एक्सक्यूज नसतो. चहाला ती कधी नाही म्हणत नाही. चहावर तिचे प्रचंड प्रम आहे. तिच्या दैनंदिन आहारात चहाचा समावेश करते.

आलिया भट

चहाचे व्यसन आलियालासुद्धा आहे. कलंक चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरूण धवनने तिच्या या व्यसनाबाबतचे सीक्रेट उघड केले होते. आलियाला जगभरातील चहा गोळा करण्याचे व्यसन आहे. आलियाला फक्त ग्रीन टीच नाही तर सर्व प्रकारचा चहा आवडतो. दूधाच्या चहाते तिला खास वेड आहे.

हेही वाचा: Tea Day : एक चुस्की चाय की.., चहाचे एवढेप्रकार माहितीयेत का?

यामी गौतम

देखणी गौतमी ही चहाप्रेमी असल्याचे तिने स्वत:च कबूल केले आहे. यामीला आवडत्या गोष्टी करताना किंवा पुस्तक वाचताना चहा प्यायला फार आवडतं. चहा लवर यामी कुठलाही विचार करत असताना तिला चहा हा लागतोच.