ईशा गुप्ताने परदेशी बॉयफ्रेंडला केला 'लिप लॉप'; बोल्ड अंदाजात नववर्ष साजरे | ISHA GUPTA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Isha Gupta celebrates New Year in bold Style
ईशा गुप्ताने परदेशी बॉयफ्रेंडला केला 'लिप लॉप'; बोल्ड अंदाजात नववर्ष साजरे | ISHA GUPTA

ईशा गुप्ताने परदेशी बॉयफ्रेंडला केला 'लिप लॉप'; बोल्ड अंदाजात नववर्ष साजरे

जन्नत 2' फेम बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Bollywood actress Isha Gupta) आपल्या बोल्ड स्टाईलमुळे (Bold style) खूप चर्चेत असते. ईशा गुप्ताची बोल्ड आणि हॉट स्टाईल चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही पाहायला मिळते. सोशल मीडियावर (Social Media) ती खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ईशा गुप्ता तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पोस्टमध्येही ईशा गुप्ताने बोल्डनेसची सीमा ओलांडल्याचं दिसत आहे. सर्वत्र नवीन वर्षाचं सेलिब्रेशन (New Year Celebration) चालू आहे. यानिमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपले खास फोटो आणि व्हिडिओ शेअर (Shared Photo and Video) करून आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा: Instagram Reels फोनमध्ये करा डाऊनलोड, ही आहे सोपी पध्दत

ईशा गुप्तानेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर (Instagram account) नववर्षाच्या निमित्ताने खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस गुलारसोबत आहे. इतकेच नाही तर ईशा गुप्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने बॉयफ्रेंडसोबत लिप लॉक किसिंगही केले आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने तपकिरी रंगाचा स्टेप डीप नेक गाऊन घातल्याचं दिसत आहे.

ईशा गुप्ताने या ड्रेससह तिचा लूक पूर्ण करण्यासाठी यासोबतच गळ्यात नाजूक नेकलेस, लाइट मेकअपसह हाय हिल्सही घातल्या आहेत. या संपूर्ण लूकमध्ये ईशा गुप्ता खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत ईशा गुप्ताने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, '2022 तुमचं आणि माझे.' ईशा गुप्ताचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

ईशाच्या चाहत्यांना आणि सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना तिचे फोटो खूप आवडतात. ते तसेच कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ईशा गुप्ता गेल्या वर्षी एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झालेल्या नकाब या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. आता ईशा इनव्हिजिबल वुमन नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी दिसणार आहे. या वेब सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top