PM Modi: मोदीजी धन्यवाद! पंतप्रधानांच्या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी मानले आभार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 PM Modi

PM Modi: मोदीजी धन्यवाद! पंतप्रधानांच्या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी मानले आभार..

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान-निकोबार येथील जी २१ निनावी बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली.

हेही वाचा: Aparna Balamurali: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याचे निलंबन

दरम्यान, चित्रपटांमध्ये परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची भूमिका साकारणाऱ्या बॉलीवूड कलाकारांनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या बेटांचे नाव परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासारख्या स्टार्सचा समावेश आहे . या स्टार्सनी ट्विट करून पीएम मोदींचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: Bigg Boss 16:अर्चनाला झटके आले की काय? स्पर्धक घाबरले...व्हिडिओ व्हायरल

अजय देवगणने 2003 मध्ये आलेल्या 'एलओसी' चित्रपटात लेफ्टनंट मनोज कुमार पांडेची भूमिका साकारली होती. बेटाचे नाव त्यांच्या नावावर ठेवल्याबद्दल अजयने ट्विट केले आणि म्हटले की, 'लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांच्या नावाने बेटाचे नाव देण्याचा निर्णय या वस्तुस्थितीला मजबुती देतो की त्यांनी मातृभूमीसाठी केलेला सर्वात मोठा त्याग पुढील पिढ्यांपर्यंत जाईल. इतरांना प्रेरणा देत राहील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.'

हेही वाचा: Pathaan Controversy: पुण्यात बजरंग दलाचा राडा! 'पठाण'चं पोस्टर फाडलं...

हेही वाचा: Pathaan Movie: 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखची हवा! मन्नत बाहेर चाहत्यांची जत्रा

सुनील शेट्टी यांनी बेटाला परमवीर चक्र विजेत्यांचे नाव दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या नावावरही एका बेटाला नाव देण्यात आले आहे.

'शेरशाह'मध्ये ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राने ट्विट केले आहे की, पीएम मोदींच्या निर्णयामुळे शेरशाह कायम जिवंत राहील याची खात्री आहे. कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने आनंदही व्यक्त केला आहे.