सुशांतच्या आत्महत्येनंतर 'इस्रायल'ने केलं ट्विट

sushant rajput
sushant rajput

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीसह सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आता इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ट्विटरवरून त्याच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे. सुशांत सिंग राजपूत खरा दोस्त असल्याचं म्हणत शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. सुशांतने रविवारी मुंबईतील बांद्रा इथं त्याच्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूड कलाकारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला होता. 

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील उपसंचालक गिलाद कोहेन यांनी मंगळवारी ट्विटरवर सुशांतच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली. कोहेन यांनी सुशांतच्या ड्राइव्ह या चित्रपटातील गाण्याची लिंक शेअर केली आहे. त्याला कॅप्शन देताना म्हटलं की, एक खरा मित्र सुशांत सिंग राजपूतच्या निधनाबद्दल शोक संवेदना. तु नेहमी आठवणीत राहशील. 

Sending my deepest condolences on the passing of sushant, a true friend of Israel. You will be missed!
Check out one of the great things that came of his trip to Israel in the link below.

— Gilad Cohen 

बॉलिवूडमधील काही चित्रपटांचे शूटिंग इस्रायलमध्ये झालं आहे. सुशांत आणि त्याची सहअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी इस्रायलमध्ये गाण्याचं शूटिंग केलं होतं. इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधामध्ये बॉलिवूड आणि मुंबईची महत्वाची भूमिका आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा नेतन्याहू यांनी मुंबईत एका कार्यक्रमात मार्गदर्शन केलं होतं. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही, राजकारण होत असल्याचा आरोप काही कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी केला आहे.

सुशांतच्या मित्रांकडून तसंच कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार तो तणावाखाली होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्याने गोळ्याही खाल्ल्या नव्हत्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com