'कोई मिल गया'मधील जादू लवकरच परतणार; पण कधी? वाचा सविस्तर...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 जुलै 2020

आता लॉकडाऊनमध्ये ही स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे. 'क्रिश 3' च्या सात वर्षानंतर हृतिक रोशन पुन्हा एकदा सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.

मुंबई : बॉलीवूडचा सुपरहिरो हृतीक रोशन 'क्रिश-4' या चित्रपटामध्ये काम करणार, राकेश रोशन लवकरच 'क्रिश-4' घेऊन येणार अशी चर्चा मागील वर्षापासून हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चिली जात होती. गेल्या वर्षी राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग झाल्यामुळे या चित्रपटाचे काम काहीसे मागे पडलेले होते. 

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...

परंतु आता लॉकडाऊनमध्ये ही स्क्रीप्ट लॉक करण्यात आली आहे. 'क्रिश 3' च्या सात वर्षानंतर हृतिक रोशन पुन्हा एकदा सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात क्रिश हा आपला आवडता सुपरहिरो 'कोई मिल गया'मधले वैज्ञानिक वडील रोहित मेहरा आणि जादू यांना परत आणण्यासाठी टाईम ट्रॅव्हलचा प्रवास करणार आहे. 

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये

या चित्रपटाला व्हीएफएक्स देण्याचे काम शाहरुख खानची रेड चिलीज व्हिज्युअल इफेक्टस ही कंपनी करणार आहे. यात अनेक सुपर व्हिलन्स दाखवण्याचा त्यांचा विचार आहे. आणि त्या प्रत्येकाला वेगळा लूक देण्यासाठी एका हॉलिवूड डिझायनरची नेमणूक करण्यात येणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

आधीच्या भागात मेहरांच्या भूमिकेला ठार मारण्यात आले होते. आता या कथेत आपल्या वडिलांना मेलेल्यातून परत आणण्यासाठी क्रिश प्रयत्न करणार आहे. रोहित कथेचा अविभाज्य भाग आहे, कारण तो जादूशी संपर्क साधू शकणारा एकुलता एक व्यक्ती आहे. 'कोई मिल गया' मधील प्रिय मित्रांना सामील करण्यासाठी राकेशजींनी पटकथा चातुर्याने तयार केली आहे. या चित्रपटाचे अन्य कलाकार अजून निश्चित झालेले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaadu from koi mil gaya going to come back in next part of krrish..