Jacqueline Fernandez :जॅकलिन करतेय घर डिझाइन ; ट्रोलर्स म्हणाले, “पैसे त्यांनी दिले का?”

गौरी खान सजवतेय जॅकलिनच्या स्वप्नातील घर...
Jacqueline Fernandez 
Gauri Khan
Jacqueline Fernandez Gauri Khanesakal

जॅकलिन मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत राहिली. ती आणि तिचा कथीत प्रियकर सुकेश चंद्रशेखर यांच्यातील सर्व प्रकरण साऱ्यांनाच माहित आहे. सुकेश चंद्रशेखरसबंधित २०० कोटीं रुपयांच्या घोटाळाप्रकरणात बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींची नावं घेण्यात आली. त्यातील काहिंची चौकशीही करण्यात आली.त्यात जॅकलिनचे नाव बरेच चर्चिले गेले.

Jacqueline Fernandez 
Gauri Khan
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या प्रकरणात जामीन मंजूर

अखेर याफसवणूकी प्रकरणात जॅकलिनला दिल्लीच्या पटियाला हाऊसने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केलाय. या प्रकरणातील पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर होण्याची शक्यता आहे.

मात्र, आता जॅकलिन सुकेशमुळे पुन्हा ट्रोल होतेय. आता कारण फसवणूक प्रकरण नाही तर गौरी खानसोबतचा 'ड्रीम होम'च्या एपिसोडचा प्रोमो आहे. मिरची पल्स ह्या युट्यूब चॅनलवर प्रोमो पहायला मिळतोय. या व्हिडिओत जॅकलिन आणि गौरी गप्पा मारतांना दिसताय. त्यात गौरी तिला विचारतेय कि तुला कसं घर हवं आहे आणि जॅकलिन तिला तिच्या स्वप्नातील घराबद्दल बोलतांना दिसतेय.

30  मिनीटाच्या या व्हिडिओला पाहुन जॅकलिनला ट्रोल करत आहेत आणि व्हिडिओला कमेंट करत आहे. ज्यात एक म्हणतोय “पैसे सुकेशने दिले का?” तर दुसरा म्हणतोय, “गौरी तुलाही यातुन कट मिळाला का?” असं विचारतोय. गौरी याआधी गौरी खानने अनेक सेलेब्सचे घर डिझाइन केले आहे. करण जोहर,काजोल, रणबीर, सिध्दार्थ मल्होत्रा यांची घरे डिझाइन केली आहेत.

Jacqueline Fernandez 
Gauri Khan
Ram Setu Trailer: 'भाऊ अंगावर आला काटा!' अक्षयच्या 'रामसेतू'च्या ट्रेलरनं वादळ

जॅकलिनचा चित्रपट रामसेतू ह्या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. 25 ऑक्टोबर 2022 ला राम सेतू चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले तर चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटिया, विक्रम मल्होत्रा ​​यांनी केले आहे. जॅकलीन फर्नांडिझसह अक्षय कुमार नुसरत भरुचा यांच्या भूमिका आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com