
Jacqueline Controversy:''मी खलनायिका नाही,मी तर परिस्थितीची बळी..''
जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) काही दिवसांपूर्वी पूरती फसली होती,इतकी की बॉलीवूडमधलं करिअर बाईंचं संपतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर सोबतचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणं तिला भलतंच महाग पडलं होतं. नुकतंच जॅकलीनने एका मुलाखतीत आपल्या गोपनीयनतेचा कसा गळा घोटला गेला याविषयी भाष्य केलं आहे. जॅकलिन फर्नांडिसचा 'बच्चन पांडे' सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि क्रिती सनन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हेही वाचा: 'झुंड' मराठीत बनवायचा होता पण...' नागराज मंजुळेनं सांगितली अडचण
जॅकलिन त्या मुलाखतीत म्हणाली,''गोपनीयतेचा भंग माणसाला वाईट बनवू शकतो. पण कोणी कितीही तसं वागायला मजबूर केलं तरी मला माझ्या मर्यादा माहिती आहेत,संयम राखणं मी परिस्थितीतून शिकलेय. ते खूप महत्वाचं असतं. आपल्याविषयी काहीतरी चुकीचं छापून येतं तेव्हा ते हजारो वार आपल्या मनावर करीत असतं. तेव्हा उठलेलं वादळ म्हणजे तुमच्या विरोधात पुकारलेलं जणू युद्ध असतं. कदाचित त्यावेळी जर स्वतःच्या मनावर,रागावर,विचारांवर ताबा ठेवणं जमलं नाही तर आपल्या तोंडून चुकीचं बोललं किंवा वागलं जाऊ शकतं ज्यामुळे आपण अनेकांच्या नजरेत वाईट बनू शकतो. ज्यामुळे पुढे आपल्यालाच अनेक गोष्टींचा त्रास होऊ शकतो. कोणी जर मुद्दामहून तुम्हाला अविश्वासू म्हणून सिद्ध करू पाहत असेल तर फक्त स्वतःला त्या परिस्थितीचा बळी ठरू देऊ नका. हताश न होता सामना करायला शिका. समोरचा चुकीचा वागला म्हणून तुम्ही तसं वागू नका,कोणा दुसऱ्याला तुमचा आनंद हिरावू देऊ नका. चांगलं वागा,सकारात्मक विचार करत जगा''.
हेही वाचा: Video:'धिप्पाड बायको,खुजा हिमेश'; एअरपोर्टवर रंगली फोटोसाठी कसरत
जेव्हा सुकेशसोबतचा तिचा एकदम पर्सनल फोटो सोशल मीडियावर लीक झाला होता तेव्हा तिनं तिच्या 'गोपनीयतेचा हा भंग केलाय' असं म्हटलं होतं. ''मला एकटं सोडा'' अशी विनवणी मीडियाला केली होती. तिनं तसं पत्रक प्रसिद्ध केलं होतं,ज्यात तिनं म्हटलं होतं,'' या देशानं मला नेहमीच खूप प्रेम आणि आदर दिला आहे. मी माझ्या मीडियातील काही मित्रपरिवाराकडून खूप गोष्टी शिकलेय. मी सध्या वाईट परिस्थितीचा सामना करीत आहे,माझ्याबाबतीत खूप विचित्र गोष्टी घडत आहेत. माझा मित्रपरिवार आणि चाहते मला लवकरच यातून बाहेर पडलेलं पाहतील. तेव्हा माझ्या मीडियातील मित्रपरिवाराला माझी विनंती आहे की,माझ्या गोपनीयतेचा भंग करू नका. माझा असो कोणताही फोटो लीक करु नका ज्यानं माझ्या गोपनीयतेवर आघात होईल. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत असं करु शकाल का? मला माहित आहे यापुढे माझ्यासोबतही असं काही तुम्ही करणार नाही. माझ्यावर यापुढे अन्याय होणार नाही,सर्वतजण समजुतीने वागतील ही आशा आहे, मी सर्वांची त्यासाठी आभारी राहीन''. अनेक दिवसांनी जॅकलिननं पुन्हा त्या वादग्रस्त विषयावर भाष्य केल्यानं सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा: शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स अन् पांढऱ्या केसांंना पाहून मलायका म्हणते...
जॅकलिन त्या कॉन्ट्रोव्हर्सी नंतर पहिल्यांदाच बच्चन पांडे सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं मीडियासमोर आली आहे. त्यानंतर ती जॉन अब्राहमसोबत अटॅक या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा १ एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. तर पुन्हा अक्षय कुमार आणि तिची जोडी राम सेतू मधनं आपल्या भेटीस येत आहे.तर सर्कस सिनेमात रणवीर सिंग सोबत जॅकलिन मोठ्या पडद्यावर दिसेल.
Web Title: Jacqueline Fernandez On Invasion Of Privacy It Can Turn You Into A Bad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..