'झुंड' मराठीत बनवायचा होता पण...' नागराज मंजुळेनं सांगितली अडचण Nagraj Manjule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagraj Manjule

'झुंड' मराठीत बनवायचा होता पण...' नागराज मंजुळेनं सांगितली अडचण

फॅन्ड्री,सैराट सारखे दर्जेदार सिनेमे मराठी इंडस्ट्रीला देणारा हरहुन्नरी अभ्यासू दिग्दर्शक नागराज मंजुळे(Nagraj Manjule)नं बॉलीवूड(Bollywood)मध्ये दणक्यात एन्ट्री केलीय. त्याचा पहिला वहिला हिंदी सिनेमा 'झुंड'(Jhund) ४मार्च,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट(Podcast) मुलाखतीत नागराजनं 'झुंड' विषयीच्या आतापर्यंत न सांगितलेल्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 'झुंड' मराठीत का नाही बनवला त्यामागची अडचण त्यानं पहिल्यांदाच ईसकाळशी बोलताना सांगितली आहे. तसंच सिनेमात अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) मध्यवर्ती भूमिकेत नसते तर कोण असतं त्याजागी यावरही त्यानं खुलासा केला आहे. पुढचा सिनेमा किती भाषेत बनवणार याची ब्रेकिंग याच मुलाखतीत ऐकाल. तेव्हा बातमीत जोडलेली मुलाखत नक्की ऐका,दस्तुरखुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्याशी बोलत आहेत.

'झुंड' सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पॉडकास्ट मुलाखत इथे वर बातमीत जोडली आहे. लिंक वर क्लीक करा आणि नक्की ऐका.

आपल्या पहिल्याच सिनेमात अमिताभ बच्चनसारख्या बॉलीवूडच्या शहनशाह ला घेऊन नागराजनं अर्धी बाजी तिथंच जिंकली होती म्हणा. पण जसं नागराजच्या सिनेमांचा हिरो सिनेमाची कथा असते तसंच 'झुंड' बाबतीतही होतं. या सिनेमाच्या कथानकाच्या माध्यमातून नागराजनं पुन्हा एकदा समाजातील वंचितांच्या समस्येला हात घालत एक नवा कोरा धाडसी विषय पडद्यावर मांडला आहे. अन्य़था झोपडपट्टी फुटबॉल संघ असतो,ज्याच्या भारतभरात संस्था आहेत,आणि विजय बारसे नामक फुटबॉल प्रशिक्षक गेली अनेक वर्ष हे कार्य अविरतपणे करतोय हे किती जणांना माहित होतं,किंवा माहित झालं असतं. पण नागराजच्या सिनेमानं एका चांगल्या कार्याला,संघर्षाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे.

हेही वाचा: Video:'धिप्पाड बायको,खुजा हिमेश'; एअरपोर्टवर रंगली फोटोसाठी कसरत

नागराज मंजुळेच्या सिनेमाचं समिक्षकांपासून मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच तोंडभरून कौतूक केलं. परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) तर इतका भारावून गेला की त्यानं थेट म्हटलं की नागराजच्या 'झुंड' सिनेमानं माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीला फुटबॉलसारखं भिरकावून दिलं आहे. नागराजनं आगामी 'शिवाजी महाराज' या त्याच्या सिनेमाविषयीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. लोकांसाठी हा सिनेमा त्यांच्या कल्पनेपेक्षा वेगळा असेल,तो कसा असेल हे त्याच्याकडूनच या पॉडकास्ट मुलाखतीत नक्की ऐका, वर लिंक बातमीत जोडली आहे. आणि हो,सोशल मीडियावरील ट्रोलर्सना नागराजनं आपल्या चांगल्या भाषेत योग्य समज काय दिलीय त्याचाही आस्वाद याच मुलाखतीत घेऊ शकाल. नागराज मंजुळे पॉडकास्ट मुलाखत वर बातमीत लिंक जोडली आहे. ऐकायला विसरु नका.

Web Title: Nagraj Manjule I Wanted To Make Jhund In Marathi But Explained The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top