
Interview: स्वामीं समर्थांची भूमिका कराल का? प्रश्नानं अंगावर काटा उभा राहिला
Tv Entertainment: मराठी मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यामध्ये जय जय स्वामी समर्थ या मालिकेचा आवर्जुन (Jay Jay Swami Samartha) उल्लेख करावा लागेल. दीड वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. त्यातील सर्वच पात्रं ही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहेत. धार्मिक मालिकांना गेल्या काही वर्षांपासून (Tv Entertainment News) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेनं जवळपास चारशेहून अधिक एपिसोडचा टप्पा पूर्ण केला असून त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. यानिमित्तानं कलर्स वाहिनीवर सुरु असणाऱ्या या मालिकेच्या कलाकारांशी सकाळच्या प्लॅटफॉर्मवरुन संवाद साधला. यावेळी स्वामी समर्थ यांची भूमिका करणारे अक्षय मुदवाडकर, चंदाच्या भूमिकेतील विजया बाबर आणि कृष्णाप्पा - नित्य पवार यांनी दिलखुलासपणे प्रश्नांना उत्तर दिली.
स्वामी समर्थ मालिका मिळण्यापूर्वीचा अक्षय कसा होता हे आम्हाला अक्षय तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल असं विचारल्यानंतर तो म्हणाला, पहिला अक्षय आणि आताचा यात खूप फरक आहे. या क्षेत्रात मी येण्यापूर्वी नोकरी केली. नाटकाची आवड होती. ती जोपासणं मला जास्त महत्वाचं वाटत होतं. एकीकडे नोकरी आणि नाटक यामध्ये तारेवरची कसरत होती. त्यामुळे मला ठाम निर्णय हा घ्यायचा होता. अशावेळी मी नाटकाची निवड केली. आणि या क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही मालिकाही केल्या. संध्याकाळी फोन आला, आम्ही स्वामींची मालिका करत आहोत, त्यात तुम्ही स्वामींची मालिका कराल का असा प्रश्न विचारला होता. ते ऐकल्यावर अंगावर काटा आला होता. ज्यांना मी लहानपणापासून घरात पाहत आलो आहे आणि अचानक त्यांची भूमिका मला करायला मिळणं हा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा होता. असंही अक्षयनं या मुलाखतीतून सांगितलं.
चंदाची भूमिका करणाऱ्या विजयानं सांगितलं की, मला या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच टीव्ही क्षेत्रात येण्याची संधी मिळाली आहे. सेटवरील सर्वच कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळत आहे. ते यापुढील प्रवासात उपयोगी पडणार आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. त्याचे शिक्षणही घेत आहे. दुसरीकडे शिक्षणही सुरु आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या निमित्तानं अनेकांशी बोलणं, भेटणं होतं त्यावेळी आनंद होतो. त्या चर्चेतून आपलं व्यक्तिमत्व आणखी घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे माझ्यादृष्टीनं हा आनंददायी प्रवास आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड होती. 2018 मध्ये एक नाटक करत होते. त्यावेळी या मालिकेचे निर्माते आले होते त्यांना माझी भूमिका आवडली. मला त्यांनी ऑडिशनसाठी बोलावलं आणि माझा प्रवास सुरु झाला. स्वामींची इच्छा होती की, मी ही भूमिका करावी...
हेही वाचा: Video: जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांशी खास गप्पा
कृष्णाप्पाच्या भूमिकेत असणाऱ्या नित्यानं देखील आपल्या भूमिकेविषयी सांगितलं. मला आता शाळेत जरी सगळे विचारत असले तरी मी मात्र त्यांच्याशी पहिला होतो त्याच पद्धतीनं वागतो. त्यात बदल केलेला नाही. माझा होमवर्क मी स्वता करतो, अनेकांना असं वाटतं की, माझं काम माझे मित्र करत असतील पण तसं नाही असंही नित्यानं यावेळी सांगितलं.
हेही वाचा: अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप
Web Title: Jai Jai Swami Samarth Tv Serial Actor Akshay Mudawadkar Vijaya Babar Interview Journey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..