
'त्या' अभिनेत्यासोबत काम करणं माझं स्वप्नच.., Janhvi Kapoor साऊथ इंडस्ट्रीत हवा करण्यासाठी तयार
जान्हवी कपुर ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीची आभिनेत्री आहे. तिची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत आहे. आता ती तिच्या अभिनयाची जादू ही साऊथ इंडस्ट्रीमध्येही पसरवण्यासाठी तयार आहे.
तिनं नुकतच तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं ज्यात तिनं तिच्या साऊथ इंडस्ट्रीत पदार्पणाची घोषणा केली होती.
'NTR 3' च्या निर्मात्यांनीही जान्हवी कपूर दिग्दर्शक कोराताला शिवच्या आगामी चित्रपटात दक्षिण सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सोबत दिसणार आहे.
त्याच वेळी, चित्रपटाचे पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केले गेले, ज्यामध्ये जान्हवी दिसली. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे लोकांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढला आहे.
दरम्यान, आता अभिनेत्रीने तिच्या साऊथ डेब्यूबद्दलची तिची उत्सुकता शेअर केली आहे. ज्युनियर एनटीआरसोबत काम करणे हे तिचं स्वप्न असल्याचं तिनं सांगितलं आहे.
जान्हवीने सांगितले की, ज्युनियर एनटीआरचा 'आरआरआर' हा चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहिला आहे. एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना, ती म्हणाली की त्याच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असेल.
ती पुढे म्हणाली की ती ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्यासाठी ती रोज प्रार्थना करत होती आणि अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जान्हवीने सांगितले की, मी माझ्या सर्व मुलाखतींमध्ये हे सांगितले होते की मला एनटीआर सरांसोबत काम करायचे आहे. या चित्रपटात मी पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करणार आहे. मी नेहमी सकारात्मक राहायला आणि माझे काम करायला शिकली आहे.
जान्हवी आता Jr NTR सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. Jr NTR च्या बहुप्रतिक्षित NTR 30 सिनेमाची सर्वांना उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून होतीच मात्र आता जान्हवीचे चाहतेही या चित्रपटसाठी उत्सुक आहेत.
Jr NTR आणि जान्हवी कपूर सोबतच अनेक प्रसिद्ध कलाकार या सिनेमाचा काम करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 18 मार्च 2023 पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. या चित्रपटा व्यतिरिक्त जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं यावर्षी ती 'बावल' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे.