रणवीरला लागलीय बाळाची ओढ; 'मुलगा की मुलगी हवी?' वाचा काय म्हणाला अभिनेता

'जयेशभाई जोरदार' या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच निमित्तानं रणवीरनं वैयक्तिक आयुष्याविषयी देखील मोठे खुलासे केले आहेत.
Ranveer Singh
Ranveer SinghGoogle
Updated on

बॉलीवूडचं प्रसिद्ध कपल रणवीर सिंग(Ranveer Singh) आणि दीपिका पदूकोण(Deepika Padukone) यांच्या लग्नाला आता चार एक वर्ष उलटून गेली आहेत. त्यामुळे अर्थातच हे दोघे आई-वडिल कधी बनणार? त्यांच्या घरात कधी लहान मुलाचा हसण्या-रडण्याचा आवाज येणार? किंवा आई-वडिल होण्यासाठी हे दोघे तयार आहेत तरी का? या सगळ्या प्रश्नांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता यांच्या चाहत्यांमध्ये असणारच. आता पहिल्यांदाच रणबीरनं या सर्व प्रश्नांवर खुलासा केला आहे. मंगळवारी रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचा ट्रेलर रीलिज झाला. जसा रणवीर ट्रेलरमधनं पुन्हा त्याच्या चाहत्यांना भुलवून गेलाय तसाच या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच इव्हेंटला त्याचा अंदाज आणि नेहमीच्या स्टाईलमधील त्याची मस्ती उपस्थितांची दाद मिळवून गेली आहे. ट्रेलर लॉंच इव्हेंटला रणवीर सिंगने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठे खुलासे केले आहेत. आपल्याला रिअल लाइफमध्ये 'मुलगा हवा की मुलगी' यावर त्यानं आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.

Ranveer Singh
भारतात पहिल्यांदाच 'शेफ' वर आधारित बायोपिक; हुमा कुरेशी साकारणार तरला दलाल

'जयेशभाई जोरदार'(Jayeshbhai Jordaar) च्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात एका पत्रकाराने रणवीरला प्रश्न केला की,''रिअल लाइफमध्ये रणवीरला मुलगा हवा की मुलगी?'' यावर प्रतिक्रिया देताना रणवीर सिंग म्हणाला,''हे तर देवाच्या हातात आहे. जे तो देईल त्याचा मी आनंदानं स्विकार करेन''. तो पुढे म्हणाला,'''जयेशभाई जोरदार' या सिनेमात एक संवाद आहे की,जेव्हा आपण देवळात जातो तेव्हा प्रसाद म्हणून शिरा दिला किंवा लाडू दिले काय, आपण जो प्रसाद मिळेल तो आनंदाने स्विकारतो,नाक मुरडत नाही.'' या संवादाचा संबंध त्यानं मुलगा की मुलगी हवी या प्रश्नाला उत्तर देताना त्याच्याशी जोडला.

Ranveer Singh
'चूक झालीय,पण व्हायरल करू नका'; अश्लील MMS लीक झाल्यावर गायिकेची याचना

रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचं कथानक खूप मजेदार आहे. सिनेमाच्या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात रणवीरनं गुजराती मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. रणवीर सिंग संपूर्ण सिनेमात आपल्या बायकोच्या पोटात वाढणाऱ्या स्त्री गर्भाला आपल्या वडिलांपासून वाचवताना दिसणार आहे. कारण वडिलांना हवा असतो मुलगा,घराण्याचा वारस. मुलीला त्याचे वडिल 'पनवती' म्हणूनच संबोधत असतात. त्यांना मुलाच्या मुलीचा जन्म होऊ द्यायचा नसतो. वडिलांविरोधात जयेशनं पुकारलेला बंड या सिनेमात एका हटके अंदाजात पहायला मिळणार आहे. सिनेमाचा ट्रेलर तर धमाकेदार आहे,आता सिनेमा किती दमदार आहे हे १३ मे रोजी कळेलच. सिनेमात रणवीर सिंगसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडे दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com