Jhund : अजय- अतुलचं गाणं शेअर करत बिग बी म्हणाले; लफडा झाला!

Jhund
JhundLafda Zhala

नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित, 'झुंड' (Jhund) हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्टारर झुंड या चित्रपटाच्या निर्मात्यांनी "लफडा झाला" हे नवीन गाणे रिलीज केले आहे. अजय गोगावले (Ajay Gogavle) यांनी गायलेले आणि अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी मंथन केलेले संगीत, हे गाणे खूप उत्साह निर्माण करणारे आहे. हे एक अशे गाणे आहे जे तुम्हाला सुरांवर झटपट नाचायला लावेल. (Lafda Zhala song out)

'सैराट' (Sairat) या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे 'झुंड' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांचा हा बायोपिक आहे. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही (Rinku Rajguru) भूमिका असल्याचं कळतंय.

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या नागराज यांच्या झुंड या चित्रपटाचे सर्वांना वेध लागले आहेत. कोरोनाच्या अगोदर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. झुंडमध्ये महानायक अमिताभ काम करणार असल्यानं चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com