काजलच्या मेहंदीचे फोटो एकदम खास; 30 ऑक्टोबरला लग्न

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 29 October 2020

२०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत चित्रपट केला होता. काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली.

मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री काजल अगरवाल ही आता विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. इंटेरिअर डिझायनिंगचा व्यवसाय करणा-या गौतम किचलुशी ती लग्न करणार आहे. काजलने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिच्या मेहंदीचे फोटो शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या प्रभावी अभिनयामुळे काजलचा फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहे. ती ३० ऑक्टोबर रोजी काजल गौतम किचलूशी लग्न करणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून काजलने होणाऱ्या पतीच्या नावाची मेहंदी लावली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने मेहंदीचा फोटो पोस्ट केला आहे.  गौतमचा इंटेरिअर डिझायनिंगचा त्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी काजलने लग्नाची बातमी दिली होती. तिने लिहिलं होतं,  ‘मी हो म्हणाले. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्न करत आहे. मुंबईत निवडक पाहुण्यांच्या  उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

'जान बंगालीत बोलला तर चालेल का ?' जान कुमार सानुच्या आईचा प्रश्न

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#kajgautkitched

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

२०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत चित्रपट केला होता. काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती आणि काजलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

 'बिहारमध्ये माझा बलात्कार झाला असता'

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kajal Aggarwal shares pic from her mehendi ceremony