Kangana Ranaut : 'बंगल्याची भरपाई नको, एकनाथ शिंदेंनी मला तर...' कंगनाचा गौप्यस्फोट!

बॉलीवूडची क्वीन म्हणून जिचे नाव घेतले त्या कंगना रनौतची भूमिका ही नेहमीच चाहत्यांना महत्वाची वाटते.
Kangana Ranaut Bollywood Actress Share CM Eknath shinde
Kangana Ranaut Bollywood Actress Share CM Eknath shinde esakal

Kangana Ranaut Bollywood Actress Share : बॉलीवूडची क्वीन म्हणून जिचे नाव घेतले त्या कंगना रनौतची भूमिका ही नेहमीच चाहत्यांना महत्वाची वाटते. समाजात जे काही घडते त्यावर ठामपणे व्यक्त होणे हे कंगना इतके आणखी कोणत्या अभिनेत्रीला वाटत नाही. त्यामुळेच की काय कंगना चर्चेचा भाग झाली आहे.

एका मराठी वाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये कंगनानं तिची आक्रमक भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. येत्या काळात जर देशाला आपली गरज वाटली तर राजकारणात येण्याची तयारी देखील तिनं दर्शवली आहे. कंगनाची ती मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी त्यावरुन तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याचे झाले असे की, २०२० मध्ये कंगनानं मुंबईमध्ये खरेदी केलेल्या अलिशान ऑफिसवर बुलडोझर फिरवण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या काळात करण्यात आलेल्या या कारवाईनं कंगनाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवातही झाली होती. मुंबई महापालिकेचे म्हणणे होते की, कंगनाचे कार्यालय हे अवैध आहे. त्यानंतर कोर्टानं पालिकेला कंगनाला भरपाई देण्यास सांगितले होते. कंगनानं देखील यावर चांगलीच आगपाखड केली होती.

Kangana Ranaut Bollywood Actress Share CM Eknath shinde
Salman Khan : सलमान खानचं ८० कोटींचं फार्महाऊस, त्यात तर...

आता कंगनानं आपल्याला ती भरपाई नको असून तिनं यापूर्वीच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिनं सांगितलं की, टॅक्स पे करणाऱ्यांच्या पैशांचा मोबदला मला देण्याची गरज नाही. कंगनाच्या त्या भूमिकेनं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Kangana Ranaut Bollywood Actress Share CM Eknath shinde
The Kerala Story Free Show : सकल हिंदू समाजातर्फे ‘द केरला स्टोरी’ दाखविला मोफत

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती आता तेजस आणि इमर्जन्सी चित्रपटाचे नाव आगामी यादीत आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाच्या व्हायरल झालेल्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तेजसमध्ये ती वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाच्या या दोन्ही चित्रपटांविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

Kangana Ranaut Bollywood Actress Share CM Eknath shinde
The Kerala Story प्रेक्षकांना भलताच आवडला!आम्ही नाय कमाईचे आकडेच सांगताय सत्य...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com