Kangana Ranaut: 'राष्ट्रवादी व्हा'! बघा कोण म्हणतंय?

कंगनाच्या त्या वक्तव्यानं आता सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे....
Kangana Ranaut
Kangana Ranautesakal

Kangana Ranaut News: आपल्याला जे वाट्टेल ते परखडपणे बोलणारी कंगना, कधी कधी भलतंच विधान करुन चर्चेत येणारी कंगना आणि देशाच्या स्वातंत्र्यावर बेताल प्रतिक्रिया देऊन सोशल मीडियावर होणारी कंगना अशी तिची वेगवेगळ्या प्रकारे ओळख सांगता येईल. बॉलीवूडची क्वीन असं ती स्वतालाही म्हणवून घेते. तिच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कायम आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं इंस्टावर शेयर केलेली पोस्ट वेगळ्याच विषयावर भाष्य करते.

कंगनानं आता इंस्टावर एक स्टोरी शेयर करुन आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडचे गुलाम नसल्याचे म्हटले आहे. भलेही कुणीही काही म्हणो पण मी कुठल्याही ब्रँडला फारसं महत्व देत नाही. असे कंगनानं त्या स्टोरीमध्ये म्हटले आहे. नेहमीप्रमाणे तिला त्यावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. काहींनी कौतूकाचा वर्षावही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना ही तिच्या आगामी इमर्जन्सी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बायोपिकवरुन चर्चेत आहे. त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Kangana post
Kangana post esakal

कंगना आणि तिची आगळी वेगळी फॅशन हा नेहमीच पाहण्याचा आणि चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. तिला फोटोग्राफर्सनं एअरपोर्टवर स्पॉट केले तेव्हा त्यावरुन सोशल मीडियावर कमेंटसा वर्षाव सुरु झाला आहे. कंगना म्हणते मी केवळ सहाशे रुपयांची साडी घालून आले आहे. त्याचे कारण मी कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडची गुलाम नाही. अर्थात कंगना हे कुणाला उद्देशुन बोलली हे कळायला चाहत्यांना वेळ लागला नाही. ती नेहमीच आपल्या सह अभिनेत्रींना टोमणे मारत असते हे चाहत्यांना कळून चुकले आहे.

Kangana Ranaut
Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

कंगनानं तिच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या स्टोरीवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीकडे सहाशे रुपयांची साडी नेसली आहे दुसरीकडे साडेतीन लाख रुपयांची बॅग बरोबर घेतली आहे. असं नेटकऱ्यांनी म्हटले आहे. मी कोलकातामधून ही साडी घेतली आहे. राष्ट्रवादी व्हा आणि त्याचा प्रचार करा असे कंगनानं म्हटले आहे. तिच्या या पोस्टची चर्चा सुरु झाली आहे.

Kangana Ranaut
Kantara Twitter Review: केजीएफचा बाप 'कांतारा', हादरवून सोडणारा, गुंगवून टाकणारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com