'दीपिका, स्वरा आणि अनुराग ' आतंकवादी' आहेत' 

'दीपिका, स्वरा आणि अनुराग ' आतंकवादी' आहेत' 

मुंबई - नवीन वर्षाची सुरुवात कंगणानं वादानं केली आहे. गेल्या वर्षभरापासून ती सगळ्यांची डोकेदुखी ठरली आहे. सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या पोस्ट शेयर करुन ती चर्चेत राहिली आहे. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक अशा अनेक बाबींवर तिनं टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरुन तिलाही कित्येकांनी सुनावले आहे. पण शांत बसेल ती कंगणा कसली, नवे वर्ष सुरुही होत नाही तितक्यात तिनं पुन्हा अभिनेत्री दीपिका पादुकोण, स्वरा भास्कर, आणि प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर कडाडून टीका केली आहे. 

कंगणानं त्या तीन कलाकारांना लक्ष्य करण्याचे कारण म्हणजे त्यांनी जेएनयुमधल्या आंदोलनाला दिलेला पाठींबा हे आहे. कंगणाला ही बाब कमालीची खटकली आहे. त्यावरुन ती चिडली आहे. आणि तिनं त्यांना चक्क आतंकवादी असे म्हटले आहे. मागील वर्षात कंगणानं सोशल मीडियावरुन अनेकांना आपल्या वाग्बाणानं घायाळ केलं आहे. नव्या वर्षाच्या तिस-याच दिवशी ती आक्रमक झाली आहे. गेल्या वर्षी सीएए वरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याविरोधात अनेकांनी आपला विरोध प्रदर्शित केला होता. यात कलाकारही मागे नव्हते. अभिनेत्री दीपिका, स्वरा आणि दिग्दर्शक अनुराग यांनी त्या आंदोलनावर टीका केली होती. 

कंगणानं व्टिट करुन त्या कलाकारांना 'filmy clowns' म्हणजे फिल्मी जोकर असे संबोधले आहे. त्यामुळे तिनं पुन्हा नव्यानं वाद तयार केला आहे. कंगणा म्हणाली, अनेकांनी सीएएच्या विरोधात आंदोलनं केली होती. त्यासाठी रस्त्यावर उतरली होते. मात्र त्यांना आपण काय करतो आहोत हे कळाले नाही. मुळातच जेएनयु मधल्या विद्यार्थ्यांनी त्याबाबत चुकीची माहिती समाजात पसरवली होती. ते अतिशय चूकीचे होते. आणि आता ही बाब समोर आली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी धावून आले होते. त्यांनी त्यांची बाजुही घेतली होती. मात्र त्यावेळी दिल्लीत जो गोंधळ झाला. अनेकांना मारहाण झाली त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, आता हे फिल्मी जोकर त्याची जबाबदारी घेणार आहेत का असा सवाल कंगणानं केला आहे. 

 त्या आंदोलन आणि विद्यार्थ्यांना पाठींबा देणारे कलाकार हे अतिरेक्यांपेक्षा कमी नाहीत. बॉलीवूड मधील आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे आता तरी विद्यार्थ्यांनी शहाणे व्हावे. झालेल्या प्रकरणातून धडा घ्यावा. देशानंही जागं व्हावं, आपली डोकी भडकवणारे हे कलाकार अतिरेक्यांपेक्षा कमी नाहीत. अशी जहरी टीका कंगणानं केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com