'ज्यो बायडन नव्हे हे तर 'गजनी बायडन'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

बायडन यांना ‘गजनी’ म्हणणे आणि त्यांचा डाटा क्रॅश होतो असे म्हणत कंगनाने बायडन यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला केला आहे. ‘गजनी’ या सिनेमात आमिरला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असल्याचे दाखवले होते.

मुंबई - कंगणा कधी काय बोलेल याचा भरवसा कुणालाही नाही. ती कुणावरही कशाही स्वरुपाची टीका करु शकते असे तिच्या आतापर्यतच्या वक्तव्यावरुन दिसून आले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ती अनेकांच्या टीकेचा विषय ठरली आहे. मात्र काहीही झालं तरी आपण व्यक्त केलेल्या मतांवर ठाम राहणे या कंगणाच्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणता येईल. आता तर कंगणाने अशा व्यक्तींवर जहरी टीका केली आहे त्यामुळे तिच्यावर सडकून टीका केली जात आहे.

कंगणाने ज्या व्यक्तीवर टीकास्त्र सोडले आहे ती कुणी साधी व्यक्ती नसून अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आहे. नुकताच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्यावर सगळ्या वर्गातून कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे कंगणाने बायडन यांच्यावर टीका करुन रोष ओढावून घेतला आहे.

जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही जो यांचे अभिनंदन केले. त्यात कंगनाने त्यांच्यावर आपला राग व्यक्त केला आहे. तिने जो बायडन यांचा चक्क ‘गजनी’ असा उल्लेख  केला आहे. तसे एक ट्विट केले. तिचे हे ट्विट सध्या व्हायरल होतेय. 

'जेठालालची तेव्हाची कमाई होती 50 रुपये'

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी विजय मिळवला आहे. जो बायडन आता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा व्हाईट हाऊसमध्ये शपथविधी पार पडणार आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन  राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यांची निवड होताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

'मिलिंदचं वय वाढलं,त्याचा बालिशपणा काही गेला नाही'

बायडन यांना ‘गजनी’ म्हणणे आणि त्यांचा डाटा क्रॅश होतो असे म्हणत कंगनाने बायडन यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला केला आहे. ‘गजनी’ या सिनेमात आमिरला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असल्याचे दाखवले होते. कंगनाच्या मते, बायडन हे सुद्धा विसराळु आहेत. मात्र दुसरीकडे अमेरिकन उपराष्ट्रपती निवड झालेल्या कमला हॅरीस यांच्या विजयावर मात्र कंगणाने आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या व्टिटमध्ये कंगणा म्हणते, ‘गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट असल्याचे तिने म्हटले आहे. 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranuat use slang word about american president joe biden