'हीच खरी क्वीन...' म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला 'त्या' बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranut Praises Bollywood Actress..Read details

'हीच खरी क्वीन...' म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला 'त्या' बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो

Kangana Ranaut: कंगना रनौतनं गेल्या काही दिवसांत रिलीज झालेल्या एकातरी सिनेमाची,त्यातील कलाकाराची प्रशंसा केलीय असं पाहिलंयत का? नाही नं, कारण सिनेमा रिलीज झाला की तो कसा पडेल यासाठी मात्र तिनं चांगलाच सिनेमाचा फडशा पाडणाऱ्या पोस्ट केलेल्या आपण नक्कीच पाहिल्या असतील. पण आता मात्र काहीतरी वेगळंच घडलंय,जे पाहून हे कंगनानं केलंय का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.

कंगना रनौतने नुकताच दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरचा सीता रामम पाहिला आणि सिनेना पाहिल्यावर जे तिला वाटलंय ते नेहमीप्रमाणे तिनं सगळ्या जगासमोर मांडलंय. सीता राममची प्रशंसा प्रेक्षकांसोबतच क्रिटिक्सनेही केली आहे. आणि आता दुसऱ्यांचे सिनेमे पाहून नेहमीच नाकं मुरडणाऱ्या कंगनानं देखील खुल्या मनानं सीता रामम सिनेमाची प्रशंसा केली आहे. इतकंच नाही तर तिनं संपूर्ण टीमचं कौतूक करत काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.(Kangana Ranaut Praises Mrunal Thakur, Seeta Ramam Movie)

Kangana Ranaut Post about Sita Ramam Movie, Mrunal Thakur

Kangana Ranaut Post about Sita Ramam Movie, Mrunal Thakur

कंगनाने या सिनेमाची प्रशंसा करत इनस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''शेवटी मला सीता रामम सिनेमा पाहण्यासाठी वेळ मिळाला. आणि हा खूप छान अनुभव होता हे मला इथं सांगावंच लागेल. एक एपिक लव्ह स्टोरी, एक्स्ट्र्राऑर्डिनरी स्क्रीनप्ले आणि डायरेक्शन. हनु राघवपुडीचं अभिनंदन, सगळ्या टीमनं उत्तम टीमवर्क केलं आहे.#Sitaramam"

हेही वाचा: R Madhavan: 'आता खूप झालं...', 'छेलो शो' च्या ऑस्कर एन्ट्रीनंतर माधवनचं मोठं विधान

पुढे आपल्या स्टोरीत सिनेमाची प्रशंसा करताना मृणाल ठाकूरची स्वतंत्ररित्या प्रशंसा कंगनानं केली आहे. अभिनेत्रीनं लिहिलं आहे, ''तसं तर सगळ्याच कलाकारांनी खूप उत्तम काम केलं आहे पण मला वाटतं सगळ्यात बेस्ट काम केलंय ते मृणाल ठाकूरनं,कोणतीही अभिनेत्री इतक्या शानदारपणे राजकुमारी नूरजहां म्हणजे सीता महालक्ष्मीची व्यक्तीरेखा साकारू शकली नसती, ज्या पद्धतीनं मृणालनं काम केलं आहे, म्हणावं लागेल कास्टिंग उत्तमच केलं आहे. ती खरोखरं क्वीन आहे...जिंदाबाद ठाकूर साब!''

इथं थोडक्यात माहितीसाठी सांगतो की सीता रामम हा सिनेमा तेलुगु मध्ये चित्रित झाला आहे. हा रोमॅंटिक सिनेमा हनु राघवपुडीने लिहिला असून दिग्दर्शितही त्यानेच केला आहे. कंगनाच्या सध्याच्या अपडेटविषयी बोलायचं तर ती सध्या 'इमरजन्सी' सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे,ज्याचं दिग्दर्शन ती स्वतः करत आहे.

Web Title: Kangana Ranut Praises Bollywood Actressread

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..