UK PM Rishi Sunak: ' ऋषी सुनक हे..' सिंगर कनिकाला मोह अनावर

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले अन् त्यांच्यावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे.
UK PM Rishi Sunak
UK PM Rishi Sunakesakal

Kanika Kapoor met with PM Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले अन् त्यांच्यावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे. एककीडे ब्रिटनची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना दुसरीकडे सुनक यांनी पंतप्रधानपदाची सुत्रं होती घेणं हे अनेकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ब्रिटनचे आतापर्यतचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून सुनक यांची निवड होणं ही देखील आगळीवेगळी बाब मानली जात आहे.

ब्रिटनच्या आतापर्यतच्या दोनशे वर्षांच्या इतिसातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या देशाला मिळालेला सर्वात तरुण पंतप्रधान. यामुळे सुनक यांच्यावर जगभरातील तरुणाईकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात प्रसिद्ध भारतीय गायिका कनिका कपूरनं ऋषीजी यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गगार हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुनक हे प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांच्यावर व्हायरल झालेले मीम्स देखील नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय आहे.

बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी सुनक यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. कनिका सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं ऋषी सुनक यांच्यासमवेत झालेल्या एका मुलाखतीचे फोटो पोस्ट केले आहेत. लंडनच्या फेयरमोंट विंडसर पार्कच्या चौथ्या वार्षिक कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सुनक सहभागी झाले होते. त्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील सांस्कृतिक बंध आणखी दृढ करण्याच्या योगदानासाठी कनिका यांचा गौरव करण्यात आला होता.

UK PM Rishi Sunak
Box Office: टॉलीवूडपुढे बॉलीवूडची डाळ शिजेना, कांतारानं रामसेतू, थँक गॉडचा उतरवला तोरा!

या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यावेळी कनिका यांना सुनक यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांचे कौतूक करताना कनिका यांनी म्हटले आहे. की, त्यांची भेट होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते खूप मोठं व्यक्तिमत्व असून त्यांच्य़ाशी संवाद साधता येणं ही एक आनंददायक बाब असल्याचे कनिक यांनी म्हटलं आहे.

UK PM Rishi Sunak
Viral Video : फिल्म प्रोड्युसरने स्वत:च्या बायकोलाच कारखाली चिरडलं; CCTV फुटेज व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com